UMEED Portal: वक्फसाठी मोदी सरकारने लॉन्च केले 'उम्मीद'; जाणून घ्या कशी होणार मालमत्तेची पडताळणी?

Waqf property Registration: केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फसाठी 'UMEED' पोर्टल सुरु केले आहे. नवीन वक्फ कायद्यानुसार, सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी 6 महिन्यांच्या आत करावी लागेल.
Union Minister Kiren Rijiju Launches 'UMEED' Portal
Union Minister Kiren RijijuDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फसाठी 'UMEED' पोर्टल सुरु केले आहे. नवीन वक्फ कायद्यानुसार, सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी 6 महिन्यांच्या आत करावी लागेल. हे पोर्टल UNIFIED WAQF MANAGMENT, EMPOWERMENT, EFFICIANCY AND DEVELOPMENT ACT 1995 अंतर्गत तयार करण्यात आले आहे.

पडताळणी मोबाईल आणि ईमेल आयडी द्वारे केली जाणार

दरम्यान, या पोर्टलमध्ये मोबाईल आणि ईमेल आयडी द्वारे पडताळणी करण्यात येईल. नोंदणीसाठी तीन लेयर तयार केले आहेत. यामध्ये मेकर, चेकर आणि अप्रूव्हलचा समावेश आहे. मेकर हा वक्फ मालमत्तेचा मुतवल्ली असेल, जो राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेश (यूटी) च्या वक्फ बोर्डाद्वारे ठरवला जाईल.

Union Minister Kiren Rijiju Launches 'UMEED' Portal
Operation Sindoor: ‘सिंदूर’ हा दहशतवादाच्या मुळावर घणाघात! मोदी सरकार, सैन्यदलांवर भाजप नेत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

सीईओ किंवा बोर्डाचे अधिकारी मान्यता देतील

यासाठी चेकर जिल्हास्तरीय अधिकारी असेल. वक्फ बोर्ड ते अधिकृत करेल. मालमत्तेची (Property) पडताळणी सीईओ किंवा बोर्डाने अधिकृत केलेल्या अधिकाऱ्याद्वारे मंजूर केली जाईल.

काय म्हणाले किरेन रिजिजू?

UMEED पोर्टलच्या लाँचिंग दरम्यान, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, 'UMEED पोर्टलच्या लाँचिंगबद्दल मी वक्फशी संबंधित सर्व मुस्लिमांचे (Muslim) अभिनंदन करु इच्छितो. हे छोटेसे पाऊल हजारो लोकांसाठी लाभदायक ठरेल.'

Union Minister Kiren Rijiju Launches 'UMEED' Portal
PM Vidya Lakshmi Scheme: मोदी सरकार देतंय विद्यार्थ्यांना 10 लाखांपर्यंत कर्ज; अर्ज कसा करावा, पात्रतेचे निकष काय?

पुढील 6 महिन्यांत मालमत्तांची नोंदणी होणार

रिजिजू पुढे म्हणाले की, ''आम्ही सर्वांशी चर्चा केली आहे. दोन्ही सभागृहांमध्ये बरीच चर्चा झाली. त्यानंतरच हा कायदा करण्यात आला. आम्ही सांगितले होते की आम्ही विलंब करणार नाही आणि तो पुढे नेऊ. आम्ही आता तेच करत आहोत. पुढील 6 महिन्यांत मालमत्तांची नोंदणी होईल. याचा फायदा सर्वांना मिळेल.''

महिला आणि अनाथ मुस्लिमांना फायदा होईल

यासोबतच, रिजीजू शेवटी म्हणाले की, 'महिला (Women) आणि अनाथ मुस्लिमांना (अनाथ मुस्लिम मुले) याचा फायदा होईल. देशभरात 9 लाख मालमत्ता आहेत. आता आपल्याला किती नोंदणी होतील ते पाहायचे आहे? मी राज्य सरकारे आणि राज्य वक्फ बोर्डांना त्यांचे काम वेळेवर पूर्ण करण्यास सांगेन. जगात आपल्या देशात सर्वाधिक वक्फ मालमत्ता आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com