''डिनर पॉलिटिक्स'', अमित शहांचा 'दादा' च्या घरी डिनर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) सध्या पश्चिम बंगालच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत.
Union Home Minister Amit Shah
Union Home Minister Amit Shah Twitter / ANI
Published on
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या पश्चिम बंगालच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी BCCI प्रमुख सौरव गांगुली यांच्यासोबत कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी शहांनी रात्रीचे स्नेहभोजन घेतले. या भेटीनंतर गांगुली भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीही याबाबत चर्चा झाली होती, मात्र त्यानंतर गांगुलीने भाजपमध्ये येण्यास नकार दिला होता. (Union Home Minister Amit Shah hosted a dinner at the residence of BCCI chief Sourav Ganguly)

दरम्यान, शाह यांची भेट घेतल्यानंतर गांगुलीने यास शिष्टाचार म्हटले. ते म्हणाले की, 'अमित शहा मला खूप दिवसांपासून ओळखतात. ते फक्त भेटायला आले आहेत.' शहा यांच्यासोबत नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पराभव करणारे सुवेंदू अधिकारीही उपस्थित होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमित शाहांनी स्वतः सौरव गांगुलीच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी गांगुलीच्या स्नेह भोजन घेतले. दुसरीकडे, भाजपला विधानसभा निवडणुकीत सौरव गांगुलीला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचे असल्याने राजकारणाच्या गोटात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Union Home Minister Amit Shah
''तेलंगणात मुख्यमंत्री नाही तर 'राजा' आहे,'' राहुल गांधींचा हल्लाबोल

तसेच, शहांनी जाहीर सभेतून ममता सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्यावरुन शहांनी ममता बॅनर्जींना घेरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, कोलकाता येथील तृणमूल भवनमध्ये गांगुली आणि शाह यांच्या भेटीबाबत ममता बॅनर्जी यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, जर गृहमंत्र्यांना सौरवच्या घरी जायचे असेल तर अडचण कुठे आहे?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com