Union Budget 2025: अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता, 'या' योजनेबाबत मिळणार गुड न्यूज

Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (१ फेब्रुवारी) रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Union Budget 2025
Union Budget 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Union Budget 2025

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (१ फेब्रुवारी) रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांच्या अनेक मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. देशातील कोट्यवधी महिलांना आनंदाची बातमी देणारी मोठी घोषणा अर्थमंत्री करू शकतात.

उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या बचत योजनेची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Savings Certificate) अर्थमंत्र्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची घोषणा केली होती.

२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेली ही योजना २०२३ मध्येच सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत, कोणत्याही राज्यातील महिला खातं उघडू शकतात. या योजनेअंतर्गत फक्त महिलांची खाती उघडली जातात.

Union Budget 2025
Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय? यातून सर्वसामान्य जनतेला काय मिळतं?

महिलांसाठी सुरू केलेल्या या बचत योजनेत ७.५ टक्के भरघोस व्याज मिळत आहे. देशात सुरू असलेल्या इतर कोणत्याही योजनेत महिलांना इतका व्याज मिळत नाही. या योजनेत, लहान मुलीपासून ते वृद्ध महिलांपर्यंत कोणालाही खातं उघडता येतं. या योजनेत एकरकमी गुंतवणूक केली जाते.

या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त २ लाख रुपये जमा करता येतात. १००० रुपयांपासून या योजनेत खातं उघडता येतं. या योजनेत २ लाख रुपये जमा केले तर मुदतपूर्तीवर एकूण २,३२,०४४ रुपये मिळतील, ज्यामध्ये ३२,०४४ रुपयांचे थेट व्याज मिळेल. जर या योजनेत १ लाख रुपये जमा केले तर मुदतपूर्तीवर एकूण १,१६,०२२ रुपये मिळतील, ज्यामध्ये १६,०२२ रुपये व्याज मिळेल.

Union Budget 2025
Union Budget 2025: सरकार महिलांसाठी एक-दोन नव्हे तर 'इतक्या' योजना चालवतं; यंदाच्या अर्थसंकल्पात मिळणार तगडं बजेट?

योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

व्याजदर: 7.5% वार्षिक (Quarterly Compounded)
मुदत: 2 वर्षे
कमीत कमी गुंतवणूक: 1 हजार रूपये
जास्तीत जास्त गुंतवणूक: 2 लाख रूपये
कोण गुंतवणूक करू शकते? कोणतीही महिला किंवा मुलीला खातं उघडता येतं.
अर्धवट पैसे काढण्याची सुविधा: 2 वर्षांच्या मुदतीपूर्वी 40% रक्कम काढण्याची परवानगी.
करसवलत: सध्या या योजनेला 80C अंतर्गत करसवलत नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी खातं कसं उघडावं?

जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक बँकेत (जसं की SBI, PNB, BoB, इ.) जा.
आवश्यक कागदपत्रे घ्या – आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो
योजनेचा अर्ज भरा आणि ठराविक रक्कम जमा करा.
खाते उघडल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com