नवी दिल्ली: केंद्र सरकारने लागु केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 7 महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपपासुन दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र चर्चेतुन शेतकऱ्यांचे समाधान होत नसल्याने आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यातच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज पुन्हा एकदा आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.(Union Agriculture Minister Narendra Singh Tomar has said that the Modi government is ready to hold discussions with farmers)
आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, शेतऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचे नरेंद्र तोमर यांच्य़ाकडुन सांगण्यात आले आहे. “शेतकऱ्यांना आवाहन करतो की, त्यांनी आपले आंदोलन संपवावे. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे” असे ट्विट नरेंद्र सिंग तोमर यांनी केले आहे. तसेच पुढे ते असेही म्हणाले की, “APMC अर्थाक बाजार समित्यांना मजबुत केले जाईल.”
दरम्यान, केद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात अनेकवेळा बैठका झाल्या आहेत. शेतकरी आंदोलनातील शेतकरी रोज वेगवेगळ्या पद्धतिने निदर्शने करत आहेत. तर केंद्र सरकारने लागु केलेले तीन्ही कायदे थेट रद्द करावे हीच मागणी असल्याने इतर कुठल्याही चर्चेत आंदोलक शेतकऱ्यांना रस नसल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे आता कृषी मंत्र्यांनी केलेल्या या आवाहनाला शेतऱ्यांकडुन कसा प्रतिसाद मिळतो हे आता पहावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.