Viral Video: थिरकली नागिन, वाजवली बीन! काकाचा हसीनासोबतचा 'डान्स' पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Nagin Dance Video: व्हिडिओमध्ये एखाद्या लग्न किंवा पार्टीतील रंगीन वातावरण स्पष्ट दिसत आहे. डीजेवर 'नागिन धुन' वाजत आहे.
Nagin Dance Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Nagin Dance Video: लग्नात 'नागिन डान्स'चा तडका आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही, पण जेव्हा डान्स फ्लोअरवर एक उत्साही काका आणि ग्लॅमरस तरुणीची जोडी एकत्र येते, तेव्हा तो व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कोण थांबवणार? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जिथे एक 'काका' हातात बीन घेऊन सापाच्या मांत्रिकाच्या अंदाजात एका 'इच्छाधारी नागिनीसोबत' थिरकताना दिसत आहेत. या काका आणि तरुणीचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघांमधील ताळमेळ पाहून संपूर्ण हॉल टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला.

आधी हा व्हिडिओ पाहा!

नागिन धुनवर काकाचा जलवा

दरम्यान, व्हिडिओमध्ये एखाद्या लग्न (Marriage) किंवा पार्टीतील रंगीन वातावरण स्पष्ट दिसत आहे. डीजेवर 'नागिन धुन' वाजत आहे आणि तिच्या तालावर एक सुंदर तरुणी साडीत नटून, अगदी नागिणीसारखी डोलत नाचत आहे. पण खरा धमाका तिच्यासोबत नाचणारे पांढऱ्या केसांचे 'काका' करत आहेत, जे स्टेजवर हातात बीन पकडून सापाचे मांत्रिक बनले आहेत. त्यांचे डान्स मूव्ह्स पाहून वाटते की, वय हा फक्त एक आकडा आहे! काकाचा बिंदास अंदाज, तरुणीच्या आजूबाजूला थिरकणारी त्यांची पाऊले आणि बीनचा आवाज, हे सर्व पाहून असे वाटते की काकाने संपूर्ण वातावरणाला रंगीन बनवले आहे.

Nagin Dance Video
Viral Video: OMG! चक्क तीन वाघ कारमध्ये घुसले; पुढे चालकाने जे केलं, ते पाहून थक्क व्हाल!

काकाच्या डोळ्यात जोश आणि पावलांमध्ये मस्ती

काका आणि त्या तरुणीची जोडी एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही. तरुणीच्या लचकदार कमरेने आणि काकाच्या मस्तीभऱ्या चालीने वातावरणात तापले. तर, मागे उभे असलेले लोक काकाच्या परफॉर्मन्सवर टाळ्या वाजवताना दिसले, तर अनेकजण आपला मोबाईल काढून त्यांचा व्हिडिओ कॅमेरात कैद करताना दिसले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काकाच्या डोळ्यात जोश आणि पावलांमध्ये अशी मस्ती आहे की कोणतीही लाज किंवा संकोच नाही, फक्त जगण्याची जिद्द दिसत आहे. लोक शिट्ट्या वाजवून काकाचे आणि तरुणीचे कौतुक करत आहेत.

Nagin Dance Video
Viral Video: फिटनेस आणि टायमिंगचं परफेक्ट उदाहरण! खेळाडूनं गरुडासारखी झेप घेत पकडला भन्नाट कॅच, व्हिडिओ एकदा बघाच

व्हिडिओवर लोकांच्या मजेदार कमेंट्स

हा व्हायरल व्हिडिओ सोशल साईट 'X' वर @Mahamud313 नावाच्या अकाउंटनरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ 1 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून 1900 हून अधिक लोकांनी लाईक केला आहे. यूजर्संनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओ पाहून कमेंट करत लिहिले की, "काका, थोडे पैसे घरच्यांसाठी पण वाचवा!" तर दुसऱ्याने म्हटले की, ''काकाने तर संपूर्ण पेन्शन हसीनावर उडवली." एका अन्य यूजरने विनोदी अंदाजात लिहिले की, "अरे काका, थांबा, नागिन तर आता थकून गेली."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com