केंद्र सरकार आणि यूजीसीकडून 'अस्मिता प्रोजेक्ट' सुरु, 22000 नवीन पुस्तकांची होणार निर्मिती; जाणून घ्या डिटेल्स

Books in Indian Languages: केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पुढील पाच वर्षांमध्ये भारतीय भाषांमध्ये 22,000 नवीन पुस्तके तयार करण्यासाठी एक प्रोजेक्ट सुरु केला आहे.
केंद्र सरकार आणि यूजीसीकडून 'अस्मिता प्रोजेक्ट' सुरु, 22000 नवीन पुस्तकांची होणार निर्मिती; जाणून घ्या डिटेल्स
Education Minister Dharmendra PradhanDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पुढील पाच वर्षांमध्ये भारतीय भाषांमध्ये 22,000 नवीन पुस्तके तयार करण्यासाठी एक प्रोजेक्ट सुरु केला आहे. ASMITA (Enhancing Study Material in Indian Languages ​​through Translation and Academic Writing) असे या प्रोजेक्टचे नाव आहे. हा प्रोजेक्ट उच्च शिक्षण सचिव संजय मूर्ती यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. UGC आणि भारतीय भाषा समिती तसेच शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक उच्चाधिकार समिती यांचा शिक्षणात भारतीय भाषांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी हा एक सहयोगी प्रयत्न आहे.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवर या प्रोजेक्टबद्दल माहिती देताना लिहिले की, "अस्मिता, बहुभाषिक शब्दकोश आणि रिअल-टाइम ट्रान्सलेशन आर्किटेक्चर या तीन महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ, भारतीय भाषांमध्ये शिक्षण प्रदान करणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात सक्षम करणे आणि भारताच्या भाषा परंपरांचे जतन आणि संरक्षण करणे हा उद्देश आहे."

"NEP च्या अनुषंगाने या उपक्रमांमुळे 22 अनुसूचित भाषांमध्ये शैक्षणिक संसाधनांचा सर्वसमावेशक पूल तयार करण्यात, भाषिक विभाजन कमी करण्यात, सामाजिक एकता आणि एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचबरोबर देशातील तरुणांना सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनवण्यात यामुळे मदत होईल," असेही ते म्हणाले.

UGC चे अध्यक्ष जगदेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, या प्रोजेक्टचा उद्देश उच्च शिक्षणातील विविध विषयांमध्ये भारतीय भाषांमध्ये अनुवाद आणि मूळ पुस्तक लेखनासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करणे आहे.

केंद्र सरकार आणि यूजीसीकडून 'अस्मिता प्रोजेक्ट' सुरु, 22000 नवीन पुस्तकांची होणार निर्मिती; जाणून घ्या डिटेल्स
PM Modi: ‘’मोदींची तिसरी टर्म आर्थिक विकासाचे नवे युग सुरु करण्यासाठी...’’; इंडिया फोरमच्या संस्थापकांनी व्यक्त केला विश्वास

कुमार पुढे म्हणाले की, "पाच वर्षांत 22 भाषांमध्ये 1,000 पुस्तके तयार करण्याचे लक्ष्य आहे, परिणामी 22,000 पुस्तके भारतीय भाषांमध्ये होतील." दुसरीकडे, या प्रोजेक्टचे नेतृत्व करण्यासाठी विविध क्षेत्रांतील सदस्य विद्यापीठांसह तेरा नोडल विद्यापीठे तयार करण्यात आली आहेत.

कुमार पुढे म्हणाले की, “यूजीसीने प्रत्येक भाषेत पुस्तक लेखन प्रक्रियेसाठी एक मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली आहे. ज्यामध्ये साहित्यिक चोरी तपासणे, अंतिम रुप देणे, डिझाइन करणे, प्रूफ-रीडिंग आणि ई-प्रकाशन इ...''

केंद्र सरकार आणि यूजीसीकडून 'अस्मिता प्रोजेक्ट' सुरु, 22000 नवीन पुस्तकांची होणार निर्मिती; जाणून घ्या डिटेल्स
Amit Shah Fake Video Case: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

याव्यतिरिक्त, मंत्रालयाने "बहुभाषिक शब्दकोश" ही लाँच केला, ज्यामध्ये सर्व भारतीय भाषांमधील सर्व शब्द आणि त्यांचे अर्थ यांचा एकल-बिंदू संदर्भ आहे.

हा उपक्रम भारतीय भाषा समितीच्या सहकार्याने सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस (CIIL) द्वारे विकसित केला जाईल. हा शब्दकोश भारतीय शब्दांचा संग्रह असेल, जो आयटी, उद्योग, संशोधन यासारख्या नवीन युगातील विविध डोमेनसाठी वाक्यांश तयार करण्यासाठी मदत करेल, असे UGC ने एका निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com