JK : लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना नागरिकांनी पकडले

पकडऱ्यांना भारतीय लष्कर देणार 2 लाखांचे रोख बक्षीस
kashmir News
kashmir News Dainik Gomantak

जम्मू-काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या राष्ट्रविघातक कृती भारतासाठी आता नव्या राहिलेल्या नाहीत. भारताशी थेट दोन हात करण्याची क्षमता नसल्याने पाकिस्तान या मार्गाचा अवलंब करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताने ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचे हे पितळ बऱ्याचदा उघडे पाडले आहे. असे असले तरी ही पाकीस्तानची ही उठाठेव थांबण्याच नाव घेत नाही. ( two lashkar e Taiba terrorists handed over police by villagers in Jammu Kashmir Reasi district )

या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी दोन सशस्त्र लष्कर-ए-तैयबा दहशतवाद्यांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती समोर आली आहे. या पकडलेल्या दहशतवाद्यांपैकी एक मोस्ट वाँटेड कमांडर असल्याचीबाब समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर कमांडर तालिब हुसैन, राजौरी जिल्ह्यातील रहिवासी आणि पुलवामा जिल्ह्यातील फैजल अहमद दार यांचा समावेश आहे. दोघांना तुकसन गावात पकडण्यात आले. नुकत्याच झालेल्या आयईडी स्फोटांचा फैसल हा मास्टरमाईंड होता.

kashmir News
मोठा आरोप! डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम तुरुगांत खोटा, चौकशीची मागणी

गावकऱ्यांनी यांच्याकडून दारूगोळाही जप्त केला आहे. त्यामूळे गावकऱ्यांना बक्षीस मिळणार असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे. यावेळी दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल, सात ग्रेनेड आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी गावकऱ्यांना त्यांच्या शौर्याबद्दल 2 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही धाडसी गावकऱ्यांना 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

kashmir News
देशात कोविड सक्रिय प्रकरणांची संख्या 1 लाख 11 हजारांहून अधिक

10 दिवसांपूर्वी दोन नवीन मॉड्यूल आढळले

जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले की, अलीकडच्या काही दिवसांत लष्कर चिनाब खोरे आणि राजौरी-पुंछमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. काही दहशतवाद्यांना पुन्हा सक्रिय करण्यात त्याला यश आले आहे.

यातून दोन मॉड्यूल बनवले होते. पहिला महिनाभरापूर्वी झालेल्या उधमपूर बॉम्बस्फोटाचा आणि दुसरा बॉम्बस्फोट राजौरी जिल्ह्यातील 10 दिवसांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाचा होता. मात्र मुख्य दहशतवादी तालिब हुसेन फरार होता. आम्ही त्याच्या मागे लागलो आणि गावकऱ्यांनी आम्हाला या दोन दहशतवाद्यांना पकडण्यात मदत केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com