संतापजनक! सुरतमध्ये अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

सुरतमध्ये अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करून तिची हत्या करण्यात आली आहे. पण 29 दिवसातच न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली आहे.
Surat Rape and Murder Case
Surat Rape and Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Surat Rape and Murder Case: संपूर्ण देशभरात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे सुरतमधल्या पांडेसरा येथे. अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Sexual Assault) करून तिची हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर पीडितेच्या कुटुंबाला भरपाई म्हणून 20 लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Surat Rape and Murder Case
व्यवहारात बँका महत्त्वाची भूमिका बजावतात; गोवा निवडणूक अधिकारी कुणाल

गुड्डू यादव असे या नराधमाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून 29 दिवसांच्या आत न्यायालयात खटला संपल्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असल्याचे सुरत न्यायालयाचे मुख्य सरकारी वकील नयन सुखडवाला यांनी सांगितले.

दिवाळीच्या रात्री वडोद येथील घराजवळून अडीच वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र शोधाशोध करूनही सापडत नसल्याने त्यांनी पांडेसरा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली. मुलीचा शोध सुरु असताना पोलिसांना तब्बल 48 तासांनंतर घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेतील शेतातील झुडपातून त्या मुलीचा मृतदेह सापडला होता.

Surat Rape and Murder Case
गोवा: NEET, GCET प्रवेशाचे वेळापत्रक DTE द्वारे जाहीर

शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला होता. अहवालात मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे समोर होते. यासंदर्भात पांडेसरा पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही पडताळून पहिले. फुटेजमधून स्पष्ट दिसत होते की, एक व्यक्ती मुलीला आपल्या मांडीवर बसवून घेऊन जात होती. सविस्तर तपासानंतर पोलिसांनी दोन मुलांचा बाप असलेल्या गुड्डू यादव याला अटक केली.

आरोपीविरुद्ध सुरत कोर्टात 246 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. दोषी आरोपी गुड्डू यादवला अवघ्या 29 दिवसांत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुलीच्या वडिलांनीही जलद न्याय मिळाल्याबद्दल सरकारी वकील आणि पोलिसांचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com