ट्विटरने(Twitter) विनय प्रकाश यांची कंपनीसाठी निवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यासह ट्विटर अकाउंट्सवर विविध प्रकरणांमध्ये केलेल्या कारवाईबाबत मासिक अहवालही ठेवण्यात आला आहे. कंपनीच्या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात कंपनीने म्हटले होते की नवीन आयटी नियमांनुसार तक्रार अधिकारी (निवास तक्रार अधिकारी) यांची नियुक्ती लवकरच आम्ही करू आणि ही नियुक्ती 11 जुलै रोजी किंवा त्यापूर्वी होईल अशी अपेक्षा आहे.याच माहितीनुसार आज अखेर ट्विटरने ही नियुक्ती केली आहे.
भारतात काही दिवसांपूर्वी सरकाने ओटीटी सहित सोशल मेडियासाठी काही नवीन नियम आणले होते त्याच नवीन नियमांनुसार 50 लाखाहून अधिक वापरकर्त्यांसह सोशल मीडिया कंपन्यांना मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल ऑफिसर आणि तक्रार अधिकारी अशा तीन महत्त्वपूर्ण नेमणुका करणे आवश्यक आहे. हे तीन अधिकारी भारताचे रहिवासी असले पाहिजेत.असा नियमही करण्यात एक होता पण आपण पहले की यावरूनच ट्विटर आणि सरकारमध्ये अनेकदा वादही झाले आणि हे प्रकरण शेवटी कोर्टात गेले आणि कोर्टानेही सरकारची बाजू घेत ट्विटरला नियमांचे पालन करण्यास भाग पाडले होते त्याच अनुषंगाने ट्विटरने हा निर्णय घेतलं आहे.
कंपनीने आपला अनुपालन अहवाल 26 मे 2021 ते 25 जून 2021 पर्यंत प्रकाशित केला आहे. 26 मेपासून अंमलात आलेल्या नवीन आयटी नियमांनुसार ही आणखी एक आवश्यकता आहे. यापूर्वी, ट्विटरने धर्मेंद्र चतूरला आयटी नियमांनुसार भारताचा अंतरिम रहिवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. गेल्या महिन्यात चतूर यांनी राजीनामा दिला होता. ट्विटरचे भारतात सुमारे 1.75 कोटी वापरकर्ते आहेत.
दरम्यान 31 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने वकील अमित आचार्य यांच्या याचिकेवर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरला नोटीस बजावली होती. वास्तविक, काही महिन्यांपूर्वी भारत सरकारने आयटीचे नवे नियम आणले होते आणि सर्व सोशल मीडिया कंपन्यांनाही याची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते, परंतु सर्व इशारेनंतरही ट्विटरने या दिशेने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.यानंतर हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले. गुरुवारी या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ट्विटरच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की निवासी तक्रार अधिकारी (आरजीओ) नियुक्त करण्यास आठ आठवडे लागतील.आणि आज अखेर
ट्विटरने विनय प्रकाश यांची नियुक्ती केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.