Trump Tariffs on India
Trump Tariffs on IndiaDainik Gomantak

Trump Tariffs on India: वाढीव आयात शुल्काचे भारतावर घोंघावतेय विघ्न, 50 टक्के भार; दागिने उद्योगावर परिणाम

Trump Tariffs: अमेरिकेतील बाजारपेठेत जाणाऱ्या भारतीय वस्तूंवर आकारण्यात येणारे ५० टक्के आयात शुल्क बुधवारपासून (ता.२७) लागू होणार असून, त्यामुळे कोळंबी, वस्त्र, चामडे, रत्न व दागदागिने यांसारख्या श्रमकेंद्रीत निर्यात क्षेत्रांवर गंभीर परिणाम होणार आहे.
Published on

नवी दिल्ली: अमेरिकेतील बाजारपेठेत जाणाऱ्या भारतीय वस्तूंवर आकारण्यात येणारे ५० टक्के आयात शुल्क बुधवारपासून (ता.२७) लागू होणार असून, त्यामुळे कोळंबी, वस्त्र, चामडे, रत्न व दागदागिने यांसारख्या श्रमकेंद्रीत निर्यात क्षेत्रांवर गंभीर परिणाम होणार आहे.

अतिरिक्त आयात शुल्कामुळे अमेरिकेला होणाऱ्या भारताच्या ८६ अब्ज डॉलरच्या निर्यातीपैकी निम्म्याहून अधिक वस्तूंवर परिणाम होईल, तर औषधे, इलेक्ट्रॉनिक्स आणि पेट्रोलियम उत्पादने यांसारख्या उर्वरित वस्तूंना मात्र करमाफी मिळणार आहे. अमेरिकेच्या सूचनेनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३१ नंतर नवे आयातशुल्क लागू होणार आहे.

Trump Tariffs on India
Chess World Cup Goa: दिल्ली नाही 'गोवा'! FIDE चेस विश्वचषक 2025 ची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

सध्या, अमेरिकेच्या बाजारात जाणाऱ्या भारतीय वस्तू आणि उत्पादनांवर आधीच २५ टक्के अतिरिक्त शुल्क लागू आहे. रशियाकडून कच्चे तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याचे कारण पुढे करून अमेरिकेकडून भारतावर आणखी २५ टक्के शुल्क लावले जाणार आहे. निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार, या शुल्कामुळे अमेरिकी बाजारातून मोठ्या प्रमाणावर भारतीय उत्पादने बाहेर पडतील.

बांगलादेश, व्हिएतनाम, श्रीलंका, कंबोडिया आणि इंडोनेशिया यासारख्या देशांच्या मालावर शुल्क खूपच कमी आहे. ‘अॅपेक’चे (अपेरल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल) सरचिटणीस मिथिलेश्वर ठाकूर यांच्या मतानुसार, वस्त्रोद्योग क्षेत्रातील निर्यात १०.३ अब्ज अमेरिकी डॉलर असून, त्याचा मोठा फटका या क्षेत्राला बसणार आहे.

नवे आयातशुल्क लागू होण्यापूर्वीच अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय वस्तू विक्रीसाठी पाठविल्याचे जुलै महिन्याच्या व्यापार आकडेवारीत दिसत आहे. जुलै महिन्यात भारतातून अमेरिकेला मालाची निर्यात १९.९४ टक्क्यांनी वाढून ८.०१ अब्ज डॉलरवर गेली, तर आयात १३.७८ टक्क्यांनी वाढली.

Trump Tariffs on India
Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

‘सेन्सेक्स’ ८४९ अंशांनी घसरला

आयातशुल्कामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली आणि भारतीय शेअर बाजार निर्देशांक आज एक टक्क्याने गडगडले. आज शेवटच्या तासात ‘सेन्सेक्स’ने ८१ हजारांचा स्तरही खालच्या दिशेने तोडला. आज ८४९.३७ अंश घसरलेला ‘सेन्सेक्स’ ८०,७८६.५४ अंशांवर स्थिरावला, तर २५५.७० अंश पडलेला ‘निफ्टी’ २४,७१२.०५ अंशांवर बंद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com