Tripura Rath Fire Video: मन पिळवटून टाकणारी दृश्ये! जगन्नाथ रथाला आग; दोन चिमुकल्यांसह 6 जणांचा होरपळून मृत्यू

Tripura News: हाय टेंशन इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्यानंतर एका रथाला आग लागली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले आहेत.
Tripura Rath Fire Video
Tripura Rath Fire VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Tripura Rath Catches Fire: त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यात विद्युत तारांच्या संपर्कात आल्यामुळे एका रथाला आग लागली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. धक्कादायक म्हणजे मृत्यू झालेल्यांमध्ये दोन लहाण मुलांचा समावेश आहे.

भगवान जगन्नाथाच्या 'उलटा रथयात्रा' उत्सवादरम्यान कुमारघाट परिसरात सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने लोक उत्साहाने 'रथ' ओढत होते. हा रथ लोखंडाचा होता. पोलिसांनी सांगितले की, मिरवणुकीदरम्यान 'रथ' चुकून 133kv ओव्हरहेड केबलच्या संपर्कात आला आणि त्याला आग लागली.

सहाय्यक महानिरीक्षक ज्योतिषमान दास चौधरी यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, "कुमारघाट येथे झालेल्या एका भीषण अपघातात, 'उलटा रथ' काढत असताना विजेच्या धक्क्याने अनेक यात्रेकरूंना प्राण गमवावे लागले आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेने मला खूप दु:ख झाले आहे. शोकाकुल परिवाराप्रती संवेदना. तसेच, मी जखमींना लवकरात लवकर बरे होवो ही सदिच्छा. या कठीण काळात राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे."

त्यांनी पुढे लिहिले की, सध्या ते घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी कुमारघाट येथे जात आहेत. "आज एका दुःखद घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे, त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आगरतळाहून कुमारघाटला जात आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com