Cricketer Died: क्रिडाविश्वात खळबळ; क्रिकेटपटूचा धावत्या ट्रेनमध्ये मृत्यू, सहकारी खेळाडू म्हणाले, "वेळेवर मदत न मिळाल्यामुळं..."

Cricketer Vikram Singh Death News: पंजाबमधील ३८ वर्षीय दिव्यांग क्रिकेटपटू विक्रम सिंगचा दिल्लीहून ग्वाल्हेरला व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेसाठी जात असताना मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Cricketer Died
Cricketer DiedDainik Gomantak
Published on
Updated on

Vikram Singh Indian Disabled Cricketer Died

छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये एक दुदैवी घटना घडली आहे. पंजाबमधील ३८ वर्षीय दिव्यांग क्रिकेटपटू विक्रम सिंगचा दिल्लीहून ग्वाल्हेरला व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेसाठी जात असताना मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

प्रवासादरम्यान सिंगची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना मदत करण्यासाठी अनेक आपत्कालीन कॉल करण्यात आले परंतु वैद्यकीय मदत वेळेवर पोहोचू शकली नाही. मदतीसाठी वारंवार प्रयत्न केले जात होते पण कोणतीही मदत मिळाली नाही. ट्रेन मथुरा स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Cricketer Died
Goa Congress: पर्रीकरांनी विरोध केलेल्या रेल्वेचा दुहेरी मार्ग रेटण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा सरकारवर आरोप; पोलिसांच्या भूमिकेवर टीका

बुधवारी रात्री सिंग आणि त्यांचे साथीदार हजरत निजामुद्दीन स्टेशनवरून छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये चढले. ट्रेन सुटल्यानंतर लगेचच त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या आणि ट्रेन मथुराजवळ येताच त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली.

Cricketer Died
Goa Schools Exams: शालेय परीक्षांबाबत मोठी अपडेट! 2 सत्रांमध्ये होणार आयोजन; प्रश्‍नपत्रिका, वेळापत्रक ‘जीएसईआरटी’द्वारे

वेळेवर मदत मिळाली नाही

टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी ४:५८ वाजता रेल्वे हेल्पलाइनवर तात्काळ वैद्यकीय मदत मागण्यासाठी आपत्कालीन कॉल करण्यात आला. अनेक वेळा फोन करूनही कोणतीही मदत मिळाली नाही.

ट्रेन सुमारे ९० मिनिटे उशिराने आली आणि अखेर सकाळी ८:१० वाजता मथुरा स्टेशनवर पोहोचली. तोपर्यंत सिंगचे निधन झाले होते. त्यांच्या एका साथीदाराने सांगितले की, "तो आमच्या डोळ्यांसमोर वेदनेने तडफडत होता. आम्ही मदतीसाठी हाका मारत राहिलो, पण कोणीही आले नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com