Accident
Accident Dainik Gomantak

Accident in Rajasthan: राजस्थानच्या सिरोहीमध्ये भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली, 3 ठार; 25 जखमी

Rajasthan: राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील पालडी एम पोलीस स्टेशन हद्दीतील अंदोरजवळ एक अनियंत्रित ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली.
Published on

Accident in Rajastan Killed 3 and 25 Injured: राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील पालडी एम पोलीस स्टेशन हद्दीतील अंदोरजवळ एक अनियंत्रित ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. या अपघातात 3 भाविकांचा मृत्यू झाला. तर 25 जण जखमी झाले आहेत.

जखमींना सिरोही येथील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काही जखमींना शिवगंज जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात ठेवला.

यात महिला आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला

जावळ येथून ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसून भाविक गौतम ऋषींच्या मेळ्याला जात होते, असे पालडी एम ठाणेदार प्रभुराम यांनी सांगितले.

यादरम्यान अंदोरजवळ ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रितपणे उलटली. घटनेची माहिती मिळताच नागरिक आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी तात्काळ जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात एक महिला (Women) आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या अपघातात 25 जण जखमी झाले आहेत.

Accident
Rajasthan: CM अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा, नवीन 19 जिल्हे बनणार; जाणून घ्या

ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये 28 जण होते

घटनेनंतर सिरोही एसडीएमसह पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी रुग्णालयात जखमींची माहिती घेत आहेत. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.

सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत. ट्रॅक्टरमध्ये बसलेले लोक जालोर जिल्ह्यातील सियाना येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आणि आमदार संयम लोढा, जिल्हाधिकारी डॉ.भंवरलाल जिल्हा रुग्णालयात (Hospital) पोहोचले. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि उपचाराबाबत पीएमओला सूचना दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com