दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

बिहार, झारखंड आणि ओडिशासह अनेक राज्यांमध्ये धुळीच्या वादळाची शक्यता
Delhi Heavy Rain
Delhi Heavy RainDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्ली एनसीआरमध्ये आज मुसळधार पाऊस आणि गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यामूळे लोधी रोड आणि आरके आश्रम मार्गावर अधिक प्रमाणात पाऊस झाल्याचं स्पष्ट झाले आहे. दिल्लीत वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्याने आधीच व्यक्त केली होती. त्यानुसार रविवारी संध्याकाळी ही दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाने दणका दिला. आज झालेल्या पावसासह सोसाट्याचा वाऱ्याने दिल्लीत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी झाली आहे. (Torrential rains in Delhi; Traffic jams in many places )

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीत किमान तापमान 28 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, तर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत राहिले. मात्र, मंगळवारी कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, 1 जून ते 5 जून या कालावधीत राजधानीत जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे.

25 जूनपर्यंत मान्सून दिल्लीत दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यावेळी मान्सून तीन दिवसांपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे. त्याचवेळी, पुढील काही दिवस बिहार, झारखंड आणि ओडिशासह अनेक राज्यांमध्ये धुळीचे वादळ येऊ शकते. याशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्येही दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी राजधानीतील कमाल तापमानाने 49 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. यादरम्यान अनेक दिवसांपासून तीव्र उष्णतेची लाट होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील तापमानात घट होऊन पारा पाच ते सात अंश सेल्सिअसने खाली आला आहे.

Delhi Heavy Rain
Karnataka: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाई फेक; तीण जण ताब्यात

उत्तराखंडसाठी रविवार आणि सोमवारी पिवळा इशारा

उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढ जिल्ह्यांसह राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळ आणि जोरदार वारे येण्याची शक्यता असल्याने हवामान खात्यानेे उत्तराखंडसाठी रविवार आणि सोमवारी पिवळा इशाराही जारी केला आहे.

शिवाय, आणखी एका घडामोडीत, नैऋत्य मोसमी पावसाने रविवारी (२९ मे) केरळमध्ये प्रवेश केला आहे, जो 1 जूनच्या नेहमीच्या तारखेच्या तीन दिवस अगोदर आहे. केरळमध्ये शनिवारपासून पाऊस पडत आहे आणि 14 पैकी 10 हवामान निरीक्षण केंद्रे आहेत. राज्यात 2.5 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे, त्यामुळे मान्सून सुरू होण्याचे निकष पूर्ण झाले आहेत, असे हवामान खात्यानेे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com