Pakistan मधून आलेल्या विस्थापित हिंदू कुटुंबांवर मोठी कारवाई, 'ही' महिला कलेक्टर पुन्हा चर्चेत!

Tina Dabi: पाकिस्तानातून विस्थापित होऊन ही हिंदू कुटुंबे भारतात आली आणि बराच काळ या भागात राहत होती.
Collector Tina Dabi
Collector Tina DabiDainik Gomantak

Pakistani Hindu: भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी टीना दाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात डीएम म्हणून तैनात असलेल्या टीना दाबी यांच्यावर आरोप आहेत की, त्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यात राहणाऱ्या काही विस्थापित हिंदू कुटुंबांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला.

पाकिस्तानातून विस्थापित होऊन ही हिंदू कुटुंबे भारतात आली आणि बराच काळ या भागात राहत होती.

त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची ही कारवाई करण्यात आली असून, प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते.

अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले

वास्तविक, ही संपूर्ण घटना राजस्थानमधील (Rajasthan) जैसलमेर जिल्ह्यातील एका गावातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील अमर सागर नावाच्या गावातील काही अतिक्रमणे हटवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते. यानंतर कडक उन्हात महिला आणि बालकांना रस्त्यावर यावे लागले आहे.

Collector Tina Dabi
Uttar Pradesh: नोएडात कोट्यवधीचा अमली पदार्थ जप्त, 9 परदेशी नागरिकांना अटक!

मिळालेल्या माहितीनुसार, अमर सागर येथून विस्थापित झाल्यानंतर अनेक कुटुंबांनी यूआयटीच्या जमिनीवर कच्च्या झोपड्या बांधून राहण्यास सुरुवात केली. एकामागून एक 30 हून अधिक विस्थापित कुटुंबांनी येथे आपले वास्तव्य केले होते.

बुलडोझर, ट्रॅक्टर आणि पोलिसांचा मोठा ताफा

काही काळापूर्वी यूआयटीने कोट्यवधींची जमीन खाली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितली होती, त्यानंतर विस्थापितांना जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते.

याप्रकरणी मंगळवारी कारवाई करण्यात आली. ही जमीनही अत्यंत मौल्यवान असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत बुलडोझर, ट्रॅक्टर आणि मोठा पोलिस (Police) बंदोबस्त होता.

Collector Tina Dabi
Rajasthan Crime: प्रेमाचा ट्रॅंगल! महिला शिक्षिकेवर जडलं तरुणाचं प्रेम, तिनं नकार देताच...

टीना दाबीची प्रतिक्रियाही समोर आली

आणखी एका मीडिया रिपोर्टनुसार, या प्रकरणी टीना दाबी यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. येथील मुख्य जमिनीवर बेकायदा कब्जा होत असल्याच्या अनेक दिवसांपासून अमर सागर सरपंच आणि इतर ग्रामस्थांच्या तक्रारी येत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

अमर सागर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पाकिस्तानी विस्थापित लोक सातत्याने स्थायिक होत आहेत. हे पाहून आम्ही अतिक्रमण हटवले. काही नवीन तर काही जुन्या अतिक्रमणांचा समावेश आहे. अजून काही अतिक्रमण हटवायचे आहे.

Collector Tina Dabi
Rajasthan Crime: धक्कादायक! पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघेजण गजाआड

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

विस्थापित लोक अतिशय गरीब आणि असहाय आहेत, पण आम्हाला अतिक्रमण होऊ द्यायचे नाही, असेही टीना दाबी यांनी वृत्तात नमूद केले आहे.

या कारवाईच्या विरोधात विस्थापितांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु आहे. अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली त्यांची घरे पाडून त्यांना बेघर करण्यात आल्याचा आरोप विस्थापितांनी केला आहे. त्यांचे पुन्हा त्याच ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी त्यांची मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com