Crime
CrimeDainik Gomantak

Rajasthan Crime: धक्कादायक! पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघेजण गजाआड

Rajasthan Crime: पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
Published on

Rajasthan Crime: राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात एका 45 वर्षीय महिलेवर तिच्या पतीसमोर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. चोरीच्या उद्देशाने चार जणांनी घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ही घटना घडली. मात्र धक्क्यामुळे हे दाम्पत्य गुरुवारी घराबाहेर पडले नाही. यानंतर त्यांनी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन गाठले. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी शनिवारी तीन आरोपींना अटक केली असून चौथ्या आरोपीचाही (Accused) शोध सुरु आहे.

Crime
Rajasthan: शाळेतल्या विद्यार्थिनीवर जडला जीव, लग्नासाठी महिला शिक्षिकेने केला लिंग बदल

पिंडवारा पोलिस उपअधीक्षक जेठू सिंह यांनी सांगितले की, महिलेचा पती चौकीदार म्हणून काम करतो. बुधवारी रात्री चौघांनी जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसून त्यांना ओलीस ठेवले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "तिने आपल्या पतीचे कपडे काढले आणि त्याच्या खिशातून 1,400 रुपये काढून घेतले.''

तसेच, आरोपींनी घरातील रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंबाबत विचारणा केली, परंतु दाम्पत्याकडे चांदीच्या दागिन्यांशिवाय काहीही नव्हते. यापेक्षा अधिक काही न मिळाल्याने त्यांनी महिलेवर (Woman) तिच्या पतीसमोरच बलात्कार केला.

Crime
Rajasthan: 8 वर्षीय मुलींची स्टॅम्प पेपरवर होतेय विक्री, गेहलोत सरकारला NHRC ची नोटीस

दुसरीकडे, माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. त्याचबरोबर, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतील पोलिस कर्मचारी आरोपींना ओळखण्यात आणि त्यांचा माग काढण्यात गुंतले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Crime
Rajasthan: 'तलाक, तलाक, तलाक' म्हणणाऱ्या नराधम नवऱ्याने बायकोवर केला हल्ला

“आरोपींची ओळख पटली असून त्यापैकी तिघांना शनिवारी अटक करण्यात आली. आमचे पथक चौथ्या आरोपीच्या शोधात असून त्यालाही लवकरच पकडण्यात येईल,'' असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com