Mann Ki Baat:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ ची वेळ बदलली...

पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला जनतेशी संवाद साधत असतात. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम प्रसारीत केला जात असतो.
Narendra Modi
Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' या महिन्यात सकाळी 11 ऐवजी 11.30 वाजता प्रसारीत होणार आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी 11.30 वाजता 'मन की बात' प्रसारण चे सुरू होईल. पंतप्रधानांचे रेडिओ संबोधन दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता होत असते. पंतप्रधान मोदी म्हणाले की "मन की बात" (Mann Ki Baat) 30 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. गांधीजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मरण करून सकाळी 11:30 वाजता मन की बातचा 85 वा भागास सुरुवात होईल.

Narendra Modi
Delhi HC on marital rape: पत्नीकडून लैंगिक संबंधाची अपेक्षा ठेवणे पतीचा अधिकार

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की, " महात्मा गांधीजींच्या (Mahatma Gandhi) पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाच्या वेळेत व तारखेत बदल करण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले. या महिन्याची मन की बात 30 जानेवारीला सकाळी 11:30 वाजता सुरू होईल." 19 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) 30 जानेवारी रोजी होणाऱ्या 'मन की बात'साठी नागरिकांना त्यांचे विचार आणि सूचना शेअर करण्यासाठी आमंत्रित केले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम प्रसारीत केला जातो.

तुम्ही सुध्दा सुचवा विषय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, "या महिन्याच्या 30 तारखेला, 2022 ची पहिली 'मन की बात' होईल. मला खात्री आहे की तुमच्याकडे प्रेरणादायी जीवन कथा आणि थीम्सच्या संदर्भात सांगण्यासारखे बरेच काही आहे. त्या आमच्याकडे पाठवा. तुम्ही MyGovOfIndia,नमो अॅप किंवा 1800-11-7800 डायल करून विषय सुचवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com