यंदा मॉन्सून त्याच्यावेळेपेक्षा पाच दिवस येण्यास उशीर झाला आहे.
यंदा मॉन्सून त्याच्यावेळेपेक्षा पाच दिवस येण्यास उशीर झाला आहे.Dainik Gomantak

यंदा वेळेपेक्षा पाच दिवस उशीरा मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला

देशाच्या उत्तरेकडे म्हणजे जम्मू-कश्मीरमध्ये मॉन्सूनची गाडी 30 जूनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. मात्र, तो जम्मू-कश्मीरमध्ये तब्बल 17 दिवस उशीराने पोहोचला आहे.
Published on

नवी दिल्ली: मॉन्सूनने (Monsoon) दिल्लीसह आता संपूर्ण देश व्यापला असल्याचे हवामान विभागाकडून (IMD) सांगण्यात आले आहे. या आधी मॉन्सूनला पोषक वातावरण (Atmosphere) नसल्याने त्याचे आगमन लांबले. त्यामुळे यंदा त्याला त्याच्यावेळेपेक्षा पाच दिवस येण्यास उशीर (Five days late) झाला आहे. आता देश व्यापल्यानंतर सर्वदूर चांगल्या पावसाची प्रतिक्षा सर्वजण करीत आहेत.

‘तौक्ते’ चक्रीवादळाने मॉन्सूनचा सुरुवातीचा प्रवास चांगला होता. त्याच्यासाठी पोषक वातावरण देखील निर्माण झाले होते. त्यामुळे मॉन्सूनची देवभूमी केरळात ऐंट्री लवकर होणार असे दिसत होते. तौक्ते वादळ पश्चिम किनाऱ्यावर धडकत नाही तोच बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत मॉन्सून अंदमानात दाखल झाला. त्यातच बंगालच्या उसागरात आणखीन एक ‘यास’ वादळ निर्माण झाले. त्यानंतर वाऱ्याची दिशा बदलल्याने मॉन्सूनची पुढील वाटचाल मंदावली.

यंदा मॉन्सून त्याच्यावेळेपेक्षा पाच दिवस येण्यास उशीर झाला आहे.
''मॉन्सून म्हणजे पाऊस नव्हे'' 

पुढे मॉन्सून 3 जून केरळा दाखल झाल्यावर मॉन्सून एक्सप्रेसने पुन्हा वेग पकडला, 4 जून गोवा, 5 जून महाराष्ट्रात आणि 10 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सूनने व्यापला. मात्र, त्याचा पुढील प्रवास पुन्हा मंदावला, देशाच्या उत्तरेकडे म्हणजे जम्मू-कश्मीरमध्ये मॉन्सूनची गाडी 30 जूनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. मात्र, तो जम्मू-कश्मीरमध्ये तब्बल 17 दिवस उशीराने पोहोचला आहे.

सर्वसाधारणपणे मॉन्सून 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. परंतु यंदा बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्तवारे भारतात उशीरा दाखल झाल्याने 23 दिवसानंतर मॉन्सून वायव्य भारतात अँक्टीव्ह झाला आणि आज (मंगळवारी) मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com