1971 मधील विजयानिमित्त यंदाचे वर्ष 'स्वर्णिम विजय वर्ष' म्हणून सरकारने केले घोषित!

1971 च्या ऐतिहासिक युद्धामुळे दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे लष्करी आत्मसमर्पण झाले, ज्यामध्ये 93 हजार शत्रू सैन्याने भारतीय सशस्त्र दलांसमोर (Indian Armed Forces) शस्त्र ठेवले.
Organizing Aerial Exhibitions
Organizing Aerial ExhibitionsDainik Gomantak
Published on
Updated on

1971 मध्ये भारताच्या त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी बांग्लादेशला पाकिस्तानच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी युध्दासारखा पर्याय निवडला. याच पाश्वभूमीवर आता 1971 च्या युद्धातील (1971 War) विजयाचे 50 वे वर्ष साजरे करत असताना, 2020-21 ला भारत सरकारने 'स्वर्णिम विजय वर्ष' म्हणून घोषित केले आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांच्या युद्ध नायकांना ‘स्वर्णिम विजय वर्ष’ (Golden Victory Year) समर्पित करण्यात आले आहे. 1971 च्या ऐतिहासिक युद्धामुळे दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे लष्करी आत्मसमर्पण झाले, ज्यामध्ये 93 हजार शत्रू सैन्याने भारतीय सशस्त्र दलांसमोर (Indian Armed Forces) शस्त्र ठेवले.

Organizing Aerial Exhibitions
दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक,या मुद्द्यांवर होणार चर्चा

दरम्यान, 1971 च्या भारत -पाक युद्धातील विजयाच्या 50 वर्षांच्या स्मरणार्थ 16 ऑक्टोबर 2021 रोजी एअर फोर्स स्टेशन पुणे येथे हवाई प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाची सुरुवात प्रसिद्ध 'एअर डेव्हिल्स' स्काय डायव्हर्सने केली, त्यांनी त्यांच्या रंगीत पॅराशूटसह Mi-17 हेलिकॉप्टरमधून उडी मारत प्रदर्शनाची सुरुवात केली. पुण्याच्या आकाशात सारंग डिस्प्ले टीमने त्यांच्या प्रगत लाइट हेलिकॉप्टरसह आणि सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने त्यांच्या हॉक एमके 152 विमानांसह एक रोमांचक एअर शो देखील दाखवला. या चार 'मेड इन इंडिया' ध्रुव प्रगत लाइट हेलिकॉप्टरसह सारंग डिस्प्ले टीमने त्यांच्या नेत्रदीपक युक्तीने मेळाव्याला मंत्रमुग्ध केले. ग्रँड फिनाले हे सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या 9 विमानांनी चमकदार प्रदर्शन करुन दाखवले. एअर चीफ मार्शल पीव्ही नाईक (Air Chief Marshal PV Naik) पीव्हीएसएम व्हीएसएम एडीसी (निवृत्त) आणि लेफ्टनंट जनरल जेएस नैन एव्हीएसएम एसएम जीओसी-इन-सी, सदर्न कमांडचे वरिष्ठ मान्यवर हवाई प्रदर्शनाचे साक्षीदार होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com