
Bike Stunt Accident: आजकाल स्मार्टफोन असलेला प्रत्येकजण सोशल मीडियावर (Social Media) आहे. विशेष म्हणजे, यातील अर्ध्याहून अधिक लोकांना रील्स आणि व्हिडिओ बनवण्याचे वेड लागले आहे. रील्स बनवणे चुकीचे नसले तरी, अनेकदा लोक या नादात आपला जीव किती महत्त्वाचा आणि मौल्यवान आहे, हे विसरुन जातात. ते रील्सच्या (Reels) मोहात पडतात आणि धोकादायक स्टंट्स (Stunts) करु लागतात. याच प्रयत्नात काही लोकांसोबत अशा घटना घडतात की, त्यांना आयुष्यभर पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Midea) व्हायरल होत आहे.
दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण रिकाम्या रस्त्यावर बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. तो काही अंतरावरुन बाईक वेगाने चालवत येतो आणि अचानक 'स्टॉपी' (Stoppie) मारतो. स्टॉपी हा बाईक किंवा सायकल स्टंट आहे, ज्यात पुढचे ब्रेक अचानक दाबून मागील चाक वर उचलले जाते. हा तरुण तेच करतो, पण बाईकचे मागील चाक जास्तच वर उचलले जाते आणि तो कोसळतो. बाईक त्याच्या पाठीवर पडते. व्हिडिओमध्ये एका ट्रान्झिशननंतर (Transition) दुसरा भाग दिसतो, ज्यात तो रुग्णालयात (Hospital) बेडवर (Bed) झोपलेला दिसतो.
हा व्हिडिओ 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर @NazneenAkhtar23 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "रीलच्या नादात पाठीचा कणा (Spine) मोडला, स्टंटबाजीचे हेच परिणाम असतात, यामुळे यश कमी आणि 'सफाया' जास्त होतो." ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला 5 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युझरने लिहिले, "मी 100 टक्के खात्रीने सांगू शकतो की याला स्टंट करण्यापूर्वी कोणीतरी नक्कीच थांबवले असेल." दुसऱ्या युझरने लिहिले, "यांच्या या कृत्यांमुळे घरातल्यांना त्रास सहन करावा लागतो, जेव्हा हे असे अंथरुणाला खिळतात." हे व्हिडिओ लोकांना धोक्याची जाणीव करुन देतात आणि अशा स्टंटबाजीपासून दूर राहण्याचा सल्ला देतात, कारण एका चुकीमुळे आयुष्यभरासाठी पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.