Punjab Election 

Punjab Election 

Dainik Gomantak 

'हे' तीन पक्ष पंजाब विधानसभा निवडणूक एकत्र लढणार

जागावाटप आणि जाहीरनामा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी प्रत्येक पक्षातील दोन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.
Published on

काँग्रेसपासून फारकत घेऊन पंजाब लोक काँग्रेस पक्षाची स्थापना करणारे कॅप्टन अमरिंदर सिंग सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांनी पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.

<div class="paragraphs"><p>Punjab Election&nbsp;</p></div>
साखरपुड्या नंतर स्मृती इराणी यांचा जावयाला इशारा

भाजप (BJP), अमरिंदर सिंग (Amarinder Singh) आणि सुखदेव सिंह धिंडसा यांचा पक्ष पंजाब (Punjab) विधानसभेची निवडणूक एकत्र लढणार आहे. जागावाटप आणि जाहीरनामा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी प्रत्येक पक्षातील दोन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. मात्र, भाजपने यापूर्वीच पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्या पक्षासोबत आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

<div class="paragraphs"><p>Punjab Election&nbsp;</p></div>
'राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कालीचरण महाराजला गजाआड करा': नवाब मलिक

माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष- पंजाब लोक काँग्रेस (PLC) ने आघाडीच्या मदतीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या आघाडीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असून राज्यात 70 हून अधिक जागा लढवण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये पंजाबमधील जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. कॅप्टन यांनी आधीच भाजपसोबत युती करण्याचे संकेत दिले होते. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले होते की, भाजपसोबत युती करण्याची माझी एकमेव अट म्हणजे शेतकरी आंदोलन (Farmer protest) आहे. पंतप्रधानांबाबत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी आधीच बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com