'ग्रीन इंडिया' मुळे देशाच्या जीडीपीमध्ये जंप करोडो लोकांना रोजगार, थिंक टँकचा दावा !

देशाच्या जीडीपी मध्ये बंपर जंप होईल आणि करोडो लोकांना नोकऱ्या मिळतील, असा दावा जागतिक थिंक टँकने केला आहे.
GDP
GDPDainik Gomantak
Published on
Updated on

'ग्रीन इंडिया' (Green India) मुळे देशाच्या जीडीपी (GDP) मध्ये बंपर जंप होईल आणि करोडो लोकांना नोकऱ्या मिळतील, असा दावा जागतिक थिंक टँकने (Think Tank) केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी अलीकडेच 2021 च्या हवामान बदल परिषदेत COP-26 मध्ये भारतासाठी 2070 पर्यंत शुद्ध-शून्य उत्सर्जन लक्ष्य जाहीर केले आहे.

ग्लासगो हवामान परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन असलेला देश बनेल. ते म्हणाले की, 2030 पर्यंत भारत 50 टक्के ऊर्जा रिन्यूएबल सोर्स निर्माण करेल. जागतिक थिंक टँक 'ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन' (ORF) च्या अहवालात असे म्हटले आहे की भारताने निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन लक्ष्याकडे वाटचाल केल्याने, देशाचा GDP 2050 पर्यंत $ 406 अब्जने वाढेल आणि 43 दशलक्ष नोकऱ्यांच्या संधी प्राप्त होतील.

GDP
गोव्यासह 5 राज्यांच्या निवडणुकीपूर्वी PM किसान योजनेचा हप्ता होणार दुप्पट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच 2021 च्या हवामान बदल परिषदेत COP-26 मध्ये भारतासाठी 2070 पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन लक्ष्य जाहीर केले. तसेच, भारताने 2030 पर्यंत आपली कमी-कार्बन वीज क्षमता 500 GW पर्यंत वाढवण्याचे आणि 2030 पर्यंत आपल्या उर्जेच्या 50 टक्के गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या एका निवेदनात म्हटले आहे की, ''भारताचे 2070 चे निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य प्रशंसनीय आहे".

GDP
गोव्यासह या आठ जिल्ह्यांतील तरूणांसाठी खूशखबर... 5 ते 25 मार्चदरम्यान होणार सैन्यभरती

येथे बुधवारी ग्लासगो येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेच्या बाजूला, देश आणि कंपन्यांच्या गटाने 2040 पर्यंत उत्सर्जन-मुक्त कारचे उद्दिष्ट साध्य करण्याची योजना जाहीर केली. कॅनडा, चिली, डेन्मार्क, भारत, न्यूझीलंड, पोलंड, स्वीडन, तुर्की आणि यूके या देशांनी त्याला पाठिंबा दिला. फोर्ड, जनरल मोटर्स, मर्सिडीज बेंझ आणि व्होल्वो कंपन्या आणि अमेरिकेतील अनेक राज्ये आणि शहरांनीही या योजनेवर स्वाक्षरी केली. व्होल्वो सारख्या काही कंपन्यांनी आधीच ज्वलन इंजिन फेज आउट करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. काही देश समान इंजिनवर चालणाऱ्या ट्रक आणि बसेसचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे वचन देत आहेत.

गेल्या सात वर्षांत क्षमता 17 पटीने वेळा वाढली आहे

भारताने रविवारी युनायटेड नेशन्स (United Nations) जलवायु शिखर सम्मेलन मध्ये सांगितले की, गेल्या सात वर्षांत देशाची सौर ऊर्जेची क्षमता 17 पटीने वाढून 45,000 मेगावॅट झाली आहे. भारताने असे प्रतिपादन केले की जागतिक लोकसंख्येपैकी 17 टक्के लोकसंख्या आहे आणि तरीही एकूण उत्सर्जनाच्या केवळ चार टक्के आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com