भारताच्या पुरातत्व विभागाने ताजमहालच्या तळघरांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती नसल्याचे सांगितले आहे. एएसआयने एका आरटीआयच्या उत्तरात ही माहिती दिली. एएसआयने असेही सांगितले की, ताजमहाल मंदिराच्या जमिनीवर बांधलेला नाहीये. 12 मे रोजी तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी यासंबंधित आरटीआय दाखल केला होता. (There are no idols of Hindu deities in the basement of Taj Mahal according to the Archaeological Department)
या याचिकेत त्यांनी एएसआयकडून दोन प्रश्नांची माहिती मागितली होती, पहिल्या प्रश्नात त्यांनी ताजमहालच्या जमिनीवर मंदिर नसल्याचा पुरावा मागितला होता, तर दुसरा प्रश्न तळघरातील 20 खोल्यांमध्ये असलेल्या हिंदू देव-देवतांच्या मूर्तींशी संबंधित प्रश्न होता.
यावर एएसआयने एका ओळीत उत्तर दिले आहे. ASI चे जनसंपर्क अधिकारी महेश चंद मीना यांनी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात फक्त 'नाही' असे लिहिले तर दुसर्याच्या प्रतिसादात, "तळघरात हिंदू देव-देवतांची मूर्ती नाहीत" असे लिहिले आहे.
यापूर्वी हिंदू संघटनांनी ताजमहालचे वर्णन तेजो महालय मंदिर असे करून ताजमहालच्या बंद खोल्यांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा केला होता आणि अशा दाव्यांनंतर हे प्रकरण झपाट्याने चर्चेत आले.
त्याचवेळी अयोध्येतील एका भाजप नेत्याने उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठामध्ये ताजमहालची तळघरे उघडण्यासाठी याचिका दाखल केली होती, त्यानंतर न्यायालयाने ती फेटाळून लावली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.