कोरोना वाढतोय मास्क वापरा! भारतात नवीन 2,685 रुग्नांची नोंदली प्रकरणे

गेल्या 24 तासात तब्बल 2,685 नवीन कोविड-19 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.
Corona Patients Updates
Corona Patients UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या 24 तासात तब्बल 2,685 नवीन कोविड-19 (Covid-19) प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, सक्रिय केस दर 16,308 वर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. दैनिक सकारात्मकता दर 0.60 टक्के आहे तर साप्ताहिक सकारात्मकता दर 0.54 टक्क्यांवर आहे. (There are 2685 new cases of corona in India)

Corona Patients Updates
केदारनाथमध्ये घोडे अन् खेचरांचे मृत्यू; भाविकांची गर्दी वाढली, सरकारने केले हात वर

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतातील कोविड रिकव्हरी 4,26,09,335 वर पोहोचला असून गेल्या 24 तासात 2,158 रुग्न बरे झाले आहेत. दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत 193.13 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 4,47,637 चाचण्या देखील घेण्यात आल्याची माहितीही मंत्रालयाने दिली.

देशव्यापी COVID-19 लसीकरण 16 जानेवारी, 2021 रोजी सुरू झाले आणि COVID-19 लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा 21 जून, 2021 रोजी सुरू झाला आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करत आहे, तर त्यांना कोविड लस देखील मोफत देत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com