Mandous Cyclone: कशी दिली जातात चक्रीवादळांना नावं?

1953 पासून नॅशनल हरिकेन सेंटर आणि वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएमओ) चक्रीवादळांची नावं ठेवत आला आहे.
Cyclone | 
Mandous Cyclone
Cyclone | Mandous CycloneDainik Gomantak
Published on
Updated on

बंगालच्या उपसागरात मेंडोस नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे पोंडिचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. पुद्दुचेरीतील कराईकल आणि आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा भागात मेंडोस चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या तडाख्याबाबत राज्य सरकारे आधीच सतर्क आहेत.

तामिळनाडू सरकारने शुक्रवारी चेन्नई, कुड्डालोर, विल्लुपुरम, कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि वेल्लोर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे, तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी दक्षिण जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

चक्रीवादळ कसे तयार होते?

एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे त्या भागाकडे वाहू लागतात. त्यावेळी वादळसदृश्य परिस्थिती निर्माण होते. तसेच वाऱ्यामध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेळाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते” सागरी चक्रीवादळात वेगवान वारे वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो. जर वादळाची तीव्रता जास्त असेल तर जीवित व वित्तहानी होण्याची भीती असते. कमी दाबाच्या क्षेत्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्याच्या वेगावरून वेगवेगळी वादळे ओळखली जातात.

या चक्रीवादळांना कशी नावे ठेवली जातात ?

जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वादळांची नावं ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे. त्यानुसार विविध देश त्यांच्यातर्फे नावं सूचवतात. वादळांची नावं देशांकडून आणि सुचवलेल्या नावांमधूनच सुचवली जातात. 1953 पासून नॅशनल हरिकेन सेंटर आणि वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएमओ) चक्रीवादळं आणि उष्णकटीबंधीय चक्रीवादळांची नावं ठेवत आला आहे.

Cyclone | 
Mandous Cyclone
Madhya Pradesh: धक्कादायक! 55 फूट खोल बोअरवेलमध्ये 3 दिवसांपासून अडकून पडलाय 8 वर्षीय मुलगा

डब्ल्यूएमओ ही जिनिवास्थित संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे. डब्ल्यूएमओच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनेल रद्द करण्यात आलं आणि संबंधित देशांनाच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावं ठेवायला सांगितलं. यानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनी मिळून एक बैठक घेतली. या देशांनी 64 नावांची एक यादी सोपवली. त्यात प्रत्येक देशात येणाऱ्या चक्रीवादळासाठी 8 नावं सूचवण्यात आली.

Cyclone | 
Mandous Cyclone
Mandous Cyclone: चक्रीवादळाच्या भीतीपोटी शाळांना सुट्टी; गोव्यासह देशात काय परिणाम होणार?

मेंडोस हे नाव कसे ठरवले?

प्रादेशिक विशेष हवामान केंद्रे (RSMC) आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळ चेतावणी केंद्रे (TCWC) द्वारे चक्रीवादळांची नावे दिली जातात. चक्रीवादळांची नावे देण्यासाठी पॅनेलवरील 13 देश (भारत, बांगलादेश, मालदीव, पाकिस्तान, कतार, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिराती, येमेन, ओमान, सौदी अरेबिया, म्यानमार आणि इराण) आहेत. सध्या सुरू असलेल्या चक्रीवादळांसाठी 13 नावांची यादी सादर करण्यात आली होती. संयुक्त अरब कडून चक्रीवादळाला मंडस असे नाव दिले आहे.

या आधी आलेल्या चक्रीवादळांची नावे - 

तौक्ते (2021), यास (2021), निसर्ग (2009), क्यार (2007), हिक्का (2019), फानी, BOB 03,  बुलबुल, जवाद, गुलाब, अम्फान, वायू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com