The story of Lord Sri Rama included in the new curriculum of madrasas run under the Uttarakhand Waqf Board:
22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन आणि राम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांचा अभिषेक झाल्यानंतर संपूर्ण देश राममय झाला आहे. देशभरातून लाखो लोक राम मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.
दरम्यान, उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या मदरशांच्या नवीन अभ्यासक्रमात भगवान श्रीरामाची कथा समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी नुकतीच ही मोठी माहिती दिली. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या मदरशांच्या नवीन अभ्यासक्रमात भगवान श्रीरामाच्या कथेचाही समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले की, मदरशातील विद्यार्थ्यांना प्रेषित मुहम्मद यांच्यासोबत श्री राम यांचे जीवन शिकवले जाईल. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत राज्यभरात 117 मदरसे चालवले जात आहेत.
उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शम्स यांनी पुढे सांगितले की, नवीन अभ्यासक्रम 2024 मध्ये मार्चपासून सुरू होणाऱ्या सत्रात लागू केला जाईल. यामध्ये विद्यार्थी श्रीरामांच्या जीवनाचाही अभ्यास करतील. ते म्हणाले की श्री राम हे एक अनुकरणीय पात्र आहे ज्यांच्याबद्दल प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे आणि त्याचे अनुकरण केले पाहिजे. आपल्या वडिलांना त्यांचे वचन पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी, श्री राम सिंहासन सोडून वनात गेले. श्रीरामांसारखा मुलगा कोणाला नको असेल?
आपल्या समुदायाच्या सदस्यांनी या निर्णयाला विरोध केला तर काय? असे विचारले असता, शम्स म्हणाले की मी घाबरत नाही. “मला विरोधाची भीती असती तर मी मुस्लिम असूनही भाजपमध्ये आलो नसतो.”
मार्चपासून उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये उत्तराखंड शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आधुनिक अभ्यासक्रम सुरू केला जाईल, असे ते म्हणाले.
मदरशांमध्येही एनसीईआरटीची पुस्तके आणली जातील, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.