भारतात स्वागत! पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना महात्मा गांधीच्या अनुयायीचे आत्मचरित्र देणार भेट

पंतप्रधान बोरिस जॉन्सन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. आज ते गांधी आश्रमालाही भेट देणार आहेत.
Boris Johnson
Boris JohnsonANI
Published on
Updated on

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (UK PM Boris Johnson ) आज त्यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर गुजरातमधील (Gujrat) अहमदाबाद (Ahmedabad,) येथे पोहोचले आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे मुक्त व्यापार कराराच्या प्रस्तावाला गती मिळण्याची अपेक्षा असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सहकार्याला चालना देण्यावर आणि संरक्षण संबंधांना पुढे नेण्यावर भर दिला जाऊ शकतो. पंतप्रधान जॉन्सन रशियाच्या (Russia) युक्रेनवरील आक्रमणावर कशी प्रतिक्रिया द्यायची याबद्दल नवी दिल्लीला कोणताही उपदेश देणार नाही. पंतप्रधानांशी जॉन्सन यांच्या संभाषणात इंडो-पॅसिफिक प्रदेशातील परिस्थितीवर विशेष भर असेल, अशी माहिती सुत्रांकडून दिली जात आहे. (Boris Johnson In India)

महात्मा गांधींच्या शिष्या मीराबेन यांचे आत्मचरित्र बोरिस जॉन्सन यांना भेट म्हणून दिले जाणार आहे. महात्मा गांधींच्या शिष्य ब्रिटीश अॅडमिरल यांची कन्या मॅडलीन स्लेड ऊर्फ मीराबेन यांचे आत्मचरित्र साबरमती आश्रमातर्फे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना भेट देण्यात येणार असल्याची माहिती aniने दिली आहे. हे महात्मा गांधींनी लिहिलेल्या पहिल्या दोन पुस्तकांपैकी एक आहे जे कधीही प्रकाशित झाले नाही.

Boris Johnson
"तुलसीभाई", WHO च्या प्रमुखांनी विचारले असता PM मोदी म्हणाले...

बोरिस जॉन्सनचे अहमदाबादमध्ये भव्य स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अहमदाबादला पोहोचले आहेत. त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान बोरिस जॉन्सन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. आज ते गांधी आश्रमालाही भेट देणार आहेत.

जॉन्सन अहमदाबादमध्ये प्रमुख उद्योगपतींची भेट घेणार

अहमदाबादमध्ये, जॉन्सन आघाडीच्या उद्योगपतींना भेटतील आणि भारत आणि ब्रिटनमधील मजबूत व्यावसायिक आणि व्यापार संबंधांवर चर्चा करतील. गुजरात आणि भारतातील पंतप्रधान जॉन्सन प्रमुख उद्योगांमध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करू शकतात, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये रोजगार निर्मिती आणि विकासाला चालना मिळेल. याशिवाय अत्याधुनिक विज्ञान, आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही नवीन सहकार्याची घोषणा केली जाऊ शकते.

Boris Johnson
जगातील सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र! रशियाचा नेमका विचार तरी काय?

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरालाही भेट देणार आहेत. बोरिस जॉन्सन गुजरात बायोटेक्नॉलॉजी विद्यापीठ आणि गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरालाही भेट देतील. वडोदरा शहराजवळील हलोल येथील जेसीबी कंपनीच्या प्लांटलाही ते भेट देतील. जॉन्सन उद्या शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com