ताजमहालच्या 22 खोल्यांचं गूढ रहस्य तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरणं

अयोध्येतील भाजप नेते डॉ.रजनीश सिंह यांनी ताजमहालबाबत (Taj Mahal) अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
Taj Mahal
Taj Mahal Dainik Gomantak
Published on
Updated on

अयोध्येतील भाजप नेते डॉ.रजनीश सिंह यांनी ताजमहालबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल केली आहे. डॉ. सिंह यांनी आपल्या याचिकेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून ताजमहालच्या (Taj Mahal) त्या 22 खोल्या उघडण्यासाठी सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे, ज्या दीर्घकाळापासून बंद आहेत. याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, ताजमहालमध्ये हिंदू देवी-देवतांची शिल्पे आणि शिलालेख असू शकतात. सर्वेक्षण केल्यास सर्वांच्या समोर येऊ शकते की, ताजमहालमध्ये हिंदूंच्या मूर्ती आणि शिलालेख आहेत की नाही? (The secret of the 22 rooms of the Taj Mahal Know when the controversy started what claims did the petitioner make)

दरम्यान, ताजमहालवरुन वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा मंदिर पाडून ताजमहाल बांधल्याचा दावा करण्यात आला आहे. ताजमहालचा वाद कधीपासून सुरु झाला? यावर लोकांनी कधी प्रश्न उपस्थित केले आणि नुकतीच हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या भाजप (BJP) नेत्याने कोणते दावे केले आहेत?

Taj Mahal
देशद्रोह कायदा : केंद्राने सुप्रीम कोर्टात दिली महत्त्वाची माहिती

ताजमहालच्या खोल्या 1934 मध्ये उघडण्यात आल्या होत्या

इतिहास अभ्यासक प्रा. एसपी वर्मा सांगतात की, 'ताजमहालमध्ये मकबऱ्याखाली 22 खोल्या बांधण्यात आल्या आहेत. या खोल्यांबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले. हे अधिकृत नाही, परंतु हे ही खरे आहे की, या खोल्या शेवटच्या वेळी 1934 मध्ये उघडल्या गेल्या होत्या. मग आता आतून ताजमहालचे काही नुकसान झाले आहे का ते पाहायचे.'

वाद कधी सुरु झाला?

इतिहास अभ्यासक प्रा. विजय बहादूर यांना हाच प्रश्न विचारला. ते म्हणाले, 'हे कधीतरी 60 आणि 70 च्या दशकातील आहे. तत्कालीन इतिहासकार पी.एन.ओक यांनी एकामागून एक अनेक लेख लिहायला सुरुवात केली. यामध्ये ताजमहालबाबत वेगवेगळे दावे करण्यात आले होते. नंतर त्यांची ताजमहालबद्दल दोन पुस्तके आली. एकाचे नाव 'ट्रू स्टोरी ऑफ ताज' आणि दुसऱ्याचे नाव होते 'ताजमहाल तेजो महालय - एक शिव मंदिर'. यामध्ये त्यांनी ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचा दावा केला होता, जे तेजो महालय म्हणून ओळखले जात होते.

Taj Mahal
कुरानमधील 26 आयत रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका

ताजमध्‍ये तपास आणि उत्‍खनन झाले तर आपले म्हणणे अगदी खरे ठरेल, असा दावाही ओक यांनी केला. दरम्यान, ओक यांनी आग्रा लाल किल्ला, काबा यासह अनेक ऐतिहासिक स्थळांवर दावा केला होता की, या हिंदूंनी बनवलेल्या वास्तू आहेत, ज्या मुस्लिम आक्रमकांनी वेळोवेळी ताब्यात घेतल्या आणि इतिहास देखील बदलला.

ओक यांनी कोणता युक्तिवाद केला आणि त्यांनी कोणते तत्व स्वीकारले?

पीएन ओक यांनी 'ट्रू स्टोरी ऑफ द ताज' मध्ये लिहिले आहे की, 'हे शिवमंदिर किंवा राजपुताना राजवाडा होता, जो शाहजहानने ताब्यात घेतला आणि त्याचे समाधीत रुपांतर केले.' ओक यांनी दावा केला की, ताजमहालमधून हिंदू अलंकार आणि प्रतिके काढून टाकण्यात आली. ओक यांच्या म्हणण्यानुसार, ज्या खोल्यांमध्ये त्या वस्तू आणि मूळ मंदिरातील शिवलिंग दडवले आहे, ते सील करण्यात आले आहे. पुढे त्यांनी आपल्या पुस्तकात दावा केला आहे की, मुमताज महलला कबरीत कधीही दफन करण्यात आले नव्हते. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ ओक यांनी यमुना नदीच्या बाजूला असलेल्या ताजमहालच्या लाकडी दरवाजांच्या कार्बन डेटिंगचा हवाला दिला आहे.

Taj Mahal
सीबीआय चौकशीसाठी परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टात याचिका

ओक यांनी आणखी कोणता युक्तिवाद दिला?

  • कोणत्याही इस्लामिक वास्तूच्या नावासोबत महाल हा शब्द वापरला जात नाही. 'ताज' आणि 'महल' हे दोन्ही शब्द मूळचे संस्कृत आहेत.

  • स्मशानभूमीला संस्कृत शब्दांचे नाव का दिले जाईल?

  • संगमरवरी पायऱ्या चढण्यापूर्वी शूज काढण्याची परंपरा आहे. ही परंपरा हिंदू मंदिरांमध्ये पाळली जाणारी परंपरा आहे. परंतु थडग्याजवळ शूज काढणे बंधनकारक नाही.

  • संगमरवरी जाळीमध्ये 108 कलशांचे चित्रण असून त्यावर 108 कलश बसवले आहेत. हिंदू मंदिर परंपरेत 108 क्रमांक देखील पवित्र मानला जातात.

  • ताजमहाल हा 'तेजोमहालय' या शब्दाची व्युत्पत्ती आहे, जो शिवमंदिराचा संदर्भ देतो. तेजोमहालय मंदिरात अग्रेश्वर महादेवाची पूज्यता होती.

  • ताजमहालच्या दक्षिणेला एक जुना गुरांचा गोठा आहे. तिथे तेजोमहालयातील पाळीव गायी बांधल्या होत्या.

  • ताजमहालच्या पश्चिमेला लाल दगडांनी बनवलेले अनेक जोड आहेत, जे स्मशानभूमीकडे पाहताना योग्य वाटत नाहीत.

  • ताज कॉम्प्लेक्समध्ये 400 ते 500 खोल्या आणि भिंती आहेत. स्मशानभूमीवर इतक्या निवासी जागा का असतील?

वाद कधी वाढला?

2015: लखनौच्या हरिशंकर जैन यांनी आग्राच्या दिवाणी न्यायालयात ताजमहालला भगवान श्री अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान तेजो महालय मंदिर म्हणून घोषित करण्यासाठी याचिका दाखल केली. त्याचा आधार बटेश्वरमध्ये सापडलेल्या राजा परमर्दिदेव यांच्या शिलालेखाला दिला गेला. दुसरीकडे मात्र 2017 मध्ये, केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांनी प्रतिदावे दाखल करताना, ताजमहालमध्ये कोणतेही मंदिर किंवा शिवलिंग असण्यास किंवा तेजो महालय म्हणून मानण्यास नकार दिला होता. नंतर जिल्हा न्यायाधीशांनी याचिका फेटाळून लावली. मात्र, जैन यांनी पुन्हा फेरविचार याचिका दाखल केली.

Taj Mahal
नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती, वाहनचालक सावधान

2017: योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री असताना राज्यसभेचे खासदार असलेले विनय कटियार यांनी ताजमहालचा मुद्दा उपस्थित केला. अयोध्या श्री रामजन्मभूमीच्या आंदोलनात विनय कटियारही पुढे होते. 'ताजमहाल'ला 'तेजो महाल' म्हणून घोषित करत कटियार यांनी योगी आदित्यनाथ यांना 'ताजमहालात जाऊन स्वतःसाठी तेथील हिंदू प्रतिके पाहावीत', असा सल्ला दिला.

2022: शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये, अयोध्या तपस्वी शिबिराशी संबंधित संत जगद्गुरु परमहंसाचार्य आग्र्यामध्ये गेले. यावेळी त्यांनी भगवे कपडे परिधान केल्यामुळे ताजमहालमध्ये प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप केला होता. नंतर परमहंसाचार्यांनीही हा ताजमहाल नसून 'तेजोमहाल' असल्याचे सांगितले. त्याचा खरा इतिहास सांगितला पाहिजे.

Taj Mahal
BJP-RSS ने भगवान रामाची प्रतिमा 'रॅम्बो' सारखी बनवली: मुख्यमंत्री भूपेश बघेल

याचिकेत काय दावे करण्यात आले आहेत?

अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे भाजप नेते डॉ. रजनीश सिंह म्हणाले की, इसवी सन.1600 मध्ये आलेल्या सर्व प्रवाशांनी आपल्या प्रवासाच्या आठवणींमध्ये राजा मानसिंगच्या राजवाड्याचे वर्णन केले आहे. ताजमहाल 1653 मध्ये बांधला गेला आणि 1951 मध्ये औरंगजेबचे एक पत्र आले, ज्यामध्ये त्याने लिहिले की, अम्मीच्या कबरीची डागडुजी करणे आवश्यक आहे.

दरम्यान, हा तेजोमहाल राजा मानसिंगचा होता असे म्हणतात. याशी संबंधित एक शिलालेख जयपूरच्या सिटी पॅलेस म्युझियममध्ये आहे. राजा मानसिंगच्या हवेलीच्या बदल्यात शाहजहानने राजा जयसिंगला चार हवेल्या दिल्या होत्या, असा उल्लेख आहे. हा हुकूम 16 डिसेंबर 1633 चा आहे. यामध्ये राजा भगवान दास यांची हवेली, राजा माधो सिंग यांची हवेली, रुपसी बैरागीची हवेली आणि सूरज सिंहचा मुलगा चंद सिंग यांची हवेली दिल्याचा उल्लेख आहे.

Taj Mahal
'फाळणीला बापू नाही तर... : मुख्यमंत्री भूपेश बघेल

याशिवाय, शाहजहानच्या फर्मानमध्ये त्याने जयसिंगकडून संगमरवरी मागवल्याचा उल्लेख आहे. या पत्राचा आधार घेत शाहजहानने जेवढे संगमरवर आदेश दिले होते, तेवढे ताजमहाल बांधण्यासाठी वापरता येणार नाही, असा दावा केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com