केंद्रात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोनाच्या लसींची संख्या वाढली नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2021 पर्यंत देशात 60 टक्के लोकसंख्येचे दोन्ही डोस होणे गरजेचे आहे. यानुसार दररोज कमीत कमी 88 लाख लोकांचे होणे आवश्यक आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या (Modi government) मंत्रीमंडळाचा विस्तार काहिदिवसांपूर्वीच पार पाडला. यामध्ये अनेक नवीन मंत्र्यांची (ministers) मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. मात्र या सगळ्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटकरत म्हणले, केंद्रात मंत्र्यांची संख्या वाढली परंतु कोरोनाच्या लसींची (Corona vaccines) संख्या वाढलेली नाही. कुठे आहेत कोरोनाच्या लसी असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे.
इंधन दरवाढीवरुन राहुल गांधींचा केंद्र सरकार निशाना

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमधून एक फोटो देखील शेअर केला आहे. यात त्यांनी लसीकरणाची आकडेवारी दिली आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2021 पर्यंत देशात 60 टक्के लोकसंख्येचे दोन्ही डोस होणे गरजेचे आहे. यानुसार दररोज कमीत कमी 88 लाख लोकांचे होणे आवश्यक आहे. पण मागील 7 दिवसांत दिवसाला सरासरी केवळ 34 लाख लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा देखील जाणवत आहे. 7 दिवसांत दररोज सरासरी 54 लाख लसींचा तुटवडा जाणवत आहे. म्हणजे 60 टक्के लसीकरणासाठी 54 लाख लसी कमी पडत आहेत. लसींच्या तुटवड्यावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Telangana Kamareddy ATM Robbery
Greater Noida Delivery Riders Fight
Ashutosh Ranka CJP press conference
Supreme Court Delhi barricades
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com