...आता नेहरू संग्रहालयाचेही नाव बदलणार; पीएम म्युझियम म्हणून असेल नवीन ओळख

NDA सरकारनेच मागील पंतप्रधानांच्या योगदानाची दखल घेतली : PM मोदी
PM Museum
PM Museumdainik gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशातील अनेक महत्त्वाच्या संस्थांचे नावात बदल करण्यात आल्यानंतर आता दिल्लीतील नेहरू संग्रहालयाचेही नाव बदलले जाणार आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नेहरू संग्रहालयाचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या संग्रहालयाचे नाव पीएम म्युझियम असे केले जाणार असून त्याचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत आज नवी दिल्लीतील आंबेडकर केंद्रात पार्लमेंटरी पार्टीच्या बैठक पार पडली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते. (The Narendra Modi government at the Center has decided to rename the Nehru Museum)

PM Museum
दाढी नाही, मग नोकरी नाही; तालिबानचे नवीन फर्मान

यावेळी पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भाजप खासदारांना सांगितले की, एनडीए सरकारने 14 माजी पंतप्रधानांच्या योगदानाची दखल घेत हे पाऊल उचलले आहे. त्याप्रमाणे नावात बदल केला जाणार आहे. तर पंतप्रधान संग्रहालयात (Museum) सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्यांचे प्रदर्शन केले जाईल. तसेच केवळ एनडीए (NDA) सरकारनेच मागील पंतप्रधानांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी अशी पावले उचलली आहेत. पीएम मोदींनी भाजप खासदारांना (MP) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाला भेट देण्यास सांगितले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी राष्ट्रीय राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.

६ एप्रिलपासून हा भाजपचा स्थापना दिन असून भाजपतर्फे (BJP) अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या स्थापना दिवसापासून ते १४ एप्रिलपर्यंत म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीपर्यंत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com