Hijab Row: 'भारताच्या अंतर्गत प्रश्नावर बोलण्याचा बाहेरील लोकांना अधिकार नाही'

हिजाब (Hijab) वादावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयाचे नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून देशाबाहेरील लोकांना भारताच्या अंतर्गत विषयावर बोलण्याचा अधिकार नाही.
External Affairs Spokesperson Arindam Bagchi
External Affairs Spokesperson Arindam BagchiDainik Gomantak
Published on
Updated on

Hijab Row: हिजाबचा वाद सध्या देशात आणि देशाबाहेरही चर्चेचा विषय ठरत आहे. हिजाब वादावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयाचे नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून देशाबाहेरील लोकांना भारताच्या अंतर्गत विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. (The Ministry Of External Affairs Has Said That Outsiders Have No Right To Speak On India's Internal Issues)

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam bagchi) यांनीही शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत युक्रेन आणि चीन सीमा विवादावर भाष्य केले. बागची म्हणाले की, चीनच्या सीमेचा प्रश्न असेल तर, आम्ही अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. त्यापेक्षा जास्त बोलण्याचे काही एक कारण नाही.

चीन सीमा प्रकरणाबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या सरकारवर झालेल्या हल्ल्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले की, हे राजकीय वक्तव्य असून धोरणात्मक नाही.

External Affairs Spokesperson Arindam Bagchi
Hijab Row: इंशा अल्लाह 'एक दिन हिजाबी प्रधानमंत्री बनेगी', ओवेसींचं ट्वीट होतयं व्हायरलं

दरम्यान, युक्रेन-रशिया वादाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये (Ukraine) राहणाऱ्या भारतीयांना बाहेर काढण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, 'आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. घाबरण्याची गरज नाही. उड्डाणे चालू आहेत. दूतावासात सामान्य कामकाज सुरु आहे.

युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याबाबत बागची म्हणाले, "अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु त्याचवेळी मला हे स्पष्ट करायचे आहे की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत." शिवाय त्यांनी असेही स्पष्ट केले की, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर 18 ते 23 फेब्रुवारीदरम्यान जर्मनी आणि फ्रान्सला भेट देणार आहेत.

External Affairs Spokesperson Arindam Bagchi
Karnataka Hijab Row: आज मालेगाव आणि जयपूरमध्ये हिजाब मोर्चा

तसेच, पंजाबमधील (Punjab) विधानसभा निवडणुकीपूर्वी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यातील जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी चीन सीमा विवादावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग असेही म्हणाले की, कोरोना काळात केंद्र सरकारच्या अदूरदर्शी धोरणांमुळे अर्थव्यवस्था ढासळली. देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे लोक त्रस्त आहेत.

External Affairs Spokesperson Arindam Bagchi
Hijab Row: कंगना राणौतच्या प्रतिक्रियेवर शबाना आझमींचे प्रश्नार्थक उत्तर

सिंग पुढे म्हणाले, 'प्रश्न केवळ देशातील समस्यांचा नाही. परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरही हे सरकार (Central Government) पूर्णपणे अपयशी ठरले आहे. गेल्या एका वर्षापासून चिनी सैनिक आपल्या हद्दीमध्ये ठाण मांडून आहेत, मात्र मोदी सरकारने संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. जुने मित्र आपल्या अदूरदर्शी नितीमुळे दुरावत चालले आहेत. तसेच शेजारी राष्ट्रांशीही देखील भारताचे संबंध बिघडत आहेत. मला वाटते, आता सत्ताधाऱ्यांना हे समजले असेल की, नेत्यांना बळजबरीने मिठी मारुन, बिनबोभाटपणे बिर्याणी खाऊन देशांचे संबंध सुधारत नाहीत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com