Karnataka government : कर्नाटकच्या पाठ्यपुस्तकांत काश्मीर आणि आसाममधील राजवंशाचा होणार समावेश

कर्नाटकातील पाठ्यपुस्तकातून टिपू सुलतानचा गौरव करणारा मजकूर वगळण्याचा निर्णय
Tipu sultan in school textbooks
Tipu sultan in school textbooks dainik gomantak
Published on
Updated on

बंगळुरू : काही दिवसांपूर्वी कर्नाटकात हिजाबवरून वादंग माजले होते. त्यानंतर हे प्रकरण सुप्रिम कोर्टात गेल्यानंतर येथील राजकीय वाद शांत झाले आहेत. मात्र आता नव्या वादाला कर्नाटक सरकारला तोंड द्यावे लागणार आहे. येथील पाठ्यपुस्तक पुनरीक्षण समितीने टिपू सुलतानचा ‘गौरव’ करणारे मजकूर वगळण्याचा निर्णय घेतला असून पाठ्यपुस्तकातून ‘टायगर ऑफ म्हैसूर’ किंवा ‘स्वातंत्र्य सेनानी' अशी वाक्ये काढून टाकण्यात येणार आहेत.

याप्रकरणी समितीने वस्तुस्थितीला चिकटून राहून माजी राज्यकर्त्यांची मते आणि गौरव काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर समितीने नवीन अभ्यासक्रमात काश्मीरमधील कर्कोटा राजवंश आणि आसाममधील अहोम घराण्याविषयी प्रकरणे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यात पुन्हा एकदा नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (The Karnataka government has plans to revise school textbooks and delete some chapters, Mysuru ruler Tipu glories)

Tipu sultan in school textbooks
मोठ्या गुन्ह्याची होती तयारी, बॉम्बस्फोटाने हादरले 'हे' शहर

तसेच पाठ्यपुस्तक पुनरीक्षण समितीच्या छाननीत बाबर आणि तुघलकावरील यांचे धडेही समोर आले आहेत. यांची जागाही कमी करण्यात येणार असून मुघल साम्राज्यावरील विस्तृत परिच्छेदही पाठ्यपुस्तकांमधून हटवले जाणार आहे. त्याऐवजी फक्त एक संक्षिप्त प्रकरण पाठ्यपुस्तकाचा भाग असेल.

दरम्यान पाठ्यपुस्तक (Textbook) पुनरीक्षण समितीचे प्रमुख रोहित चक्रतीर्थ यांनी आपले मत व्यक्त करताना, टिप्पू सुलतान असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज, जिथे जिथे आम्हाला ग्लोरिफीकेशन (glorification) आढळलं आणि ते सत्य नसेल तर आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. तसेच टिपूवरील बरेच पैलू हे खरे नसल्याने ते इयत्ता 6 ते इयत्ता 10 पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकत आहोत. या निर्णयावर काँग्रेसने (Congress) भाजपवर (BJP) सडकून टीका केली असून, इतिहासाच्या पुस्तकांचे भगवेकरण असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com