पहिली रामायण सर्किट ट्रेन दिल्लीहून धावणार, 'या' ठिकाणांना देणार भेट

ही ट्रेन 17 दिवसांच्या प्रवासात प्रभू रामाच्या जीवनाशी निगडित अयोध्या (Ayodhya), सीतामढी आणि चित्रकूटसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जाणार आहे.
Ramayana Circuit Train
Ramayana Circuit TrainTwitter/ ANI
Published on
Updated on

भारतीय रेल्वेने (Indian Railways) भगवान श्री राम यांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणे पाहण्यासाठी रामायण सर्किट (Ramayana Circuit) ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. ही ट्रेन अयोध्येसह (Ayodhya) अनेक ठिकाणी जाणार आहे. रामायण सर्किटवरील पहिली ट्रेन रविवारी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरुन सुटणार आहे. IRCTC ने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि कोविड-19 शी संबंधित परिस्थितीत झालेल्या सुधारणा लक्षात घेऊन गाड्यांद्वारे देशांतर्गत पर्यटन पुन्हा सुरु करण्याच्या दिशेने ही योजना बनवली आहे.

पहिली ‘रामायण सर्किट’ ट्रेन आज दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरुन सुटेल. ही ट्रेन 17 दिवसांच्या प्रवासात प्रभू रामाच्या जीवनाशी निगडित अयोध्या, सीतामढी आणि चित्रकूटसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जाणार आहे.

Ramayana Circuit Train
अफगाणिस्तान मुद्द्यावर भारतात होणार NSA स्तरावरील प्रादेशिक परिषद

IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, या डिलक्स एसी ट्रेनमध्ये फर्स्ट एसी आणि सेकंड एसी असे दोन प्रकारचे डबे आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून प्रत्येक डब्यात सुरक्षा रक्षकाचीही व्यवस्था आहे. ट्रेनमध्ये दोन डायनिंग रेस्टॉरंट, आधुनिक किचन, डब्यात शॉवर रुम अशा सुविधाही देण्यात आल्या आहेत.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने काल एका निवेदनात सांगितले की, असा एक प्रवास जो 7 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. त्यानंतर इतर चार गाड्याही सुटतील.

दक्षिण भारतातील धार्मिक पर्यटन लक्षात घेता, IRCTC श्री रामायण यात्रा एक्सप्रेस-मदुराई चालवेल. ही ट्रेन मदुराईहून निघेल आणि हंपी, नाशिक, चित्रकूट, अलाहाबाद, वाराणसी येथे जाऊन मदुराईला परतेल. ही गाडी 16 नोव्हेंबरला सुटेल. श्री रामायण यात्रा एक्सप्रेस-श्री गंगानगर 25 नोव्हेंबरला निघणार असल्याचे सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com