Debate On Modi-Yogi: राजकारणावर जरा सांभाळूनच बोला! ड्राइव्हरची मोदी-योगींना शिवीगाळ; विरोध केला म्हणून वऱ्हाड्याला बोलेरोखाली चिरडले

येथे दोघांमधील जोरदार राजकीय वादानंतर बोलेरो चालकाने वराच्या काकांना बोलेरो गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे.
PM Modi and Yogi Adityanath
PM Modi and Yogi AdityanathDainik Gomantak
Published on
Updated on

रस्त्यावर आणि चौकाचौकात राजकीय वादविवाद करणारे लोक तुम्ही पाहिले असतील. कधी-कधी घरातही काका-काकू-मामा-मामींना राजकीय चर्चांमध्ये गुरफटताना पाहिलं असेल.

अनेक वेळा असे वाद घालताना लोकांना खूप राग येतो, पण या काळात कोणी कोणाचा तरी खूनही करू शकतो का? कारण उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

येथे दोघांमधील जोरदार राजकीय वादानंतर बोलेरो चालकाने वराच्या काकांना बोलेरो गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे.

हे प्रकरण मिर्झापूरच्या विंध्याचल पोलीस स्टेशनच्या परिसरात घडले आहे. येथील कोलाही परिसरात राहणारे राजेश धर दुबे हे त्यांच्या पुतण्याच्या लग्नासाठी मिर्झापूर शहरात गेले होते. तेथून दुसऱ्या दिवशी ते घरी परतत होते. परतत असताना अमजद या वाहन चालकाचा राजेश दुबे याच्याशी राजकीय वाद झाल्याचा आरोप आहे.

पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्याबाबत हा वाद झाला. राजकीय वाद सुरू असताना रागाच्या भरात अमजदने राजेशला कारने चिरडले, असा आरोप आहे. बोलेरो चालक अमजदने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ केल्याचे राजेशच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे, त्याला राजेशने विरोध केला होता. यानंतरच दोघांमध्ये वाद सुरू झाला.

PM Modi and Yogi Adityanath
Satpura Bhavan : योगायोग की षडयंत्र! मध्य प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावरच सातपुडा भवनाला का लागते आग? हजारो फाइल्स जळून खाक
'अमजद बोलेरो गाडी वेगाने चालवत होता, त्यावर राजेश म्हणाले की आरामात चालव, पंतप्रधानांनाही उशीर होतो... यावर अमजदने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राजेशने त्याला असे म्हणू नकोस असे सांगितले. पुढे सांगितले, हे पाहून अमजद आणि राजेश यांच्यात वादावादी सुरू झाली, यादरम्यान अमजदने राजेशला कारमधून बाहेर ढकलले, राजेशने कारमधून पडताना काच पकडली आणि लटकत राहिला. मात्र, गाडी थांबवण्याऐवजी अमजदने राजेशला ओढत नेले आणि काही वेळात तो बोलेरोच्या खाली आला. त्यानंतर चालक वाहन सोडून पळून गेला.
मृताच्या कुटुंबीयांची माहिती

या घटनेनंतर राजेश धर दुबे याच्या कुटुंबीयांनी चालक अमजदविरुद्ध विंध्याचल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. काही तासांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत अमजदने या घटनेची वेगळीच कहाणी सांगितली आहे.

मृताच्या कुटुंबीयांनी या प्रकरणातील आरोपी ड्रायव्हर अमजद खान याच्यावर पूर्वनियोजित हत्येचा आरोप केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या सहा तासांत आरोपीला अटक करण्यात आली.

PM Modi and Yogi Adityanath
Om Birla Goa Visit: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला 'या' दिवशी गोव्यात; आमदारांना संबोधित करणार
चौकशीत अमजदने सांगितले की, मिरवणुकीसाठी बोलेरो भाड्याने घेतली होती, तो मिरवणुकीतून बोलेरो परत आणत होता, एक एक करून वऱ्हाड्यांना उतरवत होता. एका ठिकाणी तो म्हणाला की सर्व वऱ्हाड्यांनी इथे उतरावे, कारण त्याला दुसऱ्या ठिकाणी जायचे आहे. 'यावरून वाद झाल्याचे चालकाचे म्हणणे आहे. नंतर बोलेरो मधून एक वऱ्हाडी खाली उतरला आणि तो पुढे गेला आणि अचानक वळला, त्या दरम्यान बोलेरोची त्याला धडक बसली आणि नंतर त्याला वाचवण्याच्या नादात संपूर्ण बोलेरो त्याच्या अंगावर गेली.
चालकाचे मत

या घटनेचे सर्व पुरावे गोळा करण्यात येत असल्याची माहिती एसपी संतोष मिश्रा यांनी यावेळी दिली. घटनेच्या वेळी वाहनात बसलेल्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com