'मुस्लिम प्रतिकांची नावे बदला', दिल्ली भाजपने केली मागणी

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) दिल्ली युनिटने रस्त्यांची नावे 'मुस्लिम गुलामगिरी प्रतीकांची' बदलण्याची मागणी केली आहे.
Akbar Road
Akbar RoadDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) दिल्ली युनिटने रस्त्यांची नावे 'मुस्लिम गुलामगिरी प्रतीकांची' बदलण्याची मागणी केली आहे. दिल्ली भाजपचे प्रमुख आदेश गुप्ता यांनी NDMC ला पत्र लिहून तुघलक रोड, अकबर रोड, औरंगजेब लेन, हुमायून रोड आणि शाहजहान रोडची नावे बदलण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, आदेश गुप्ता यांनी तुघलक रोडचे नाव बदलून गुरु गोविंद सिंग मार्ग, अकबर रोडचे नाव महाराणा प्रताप रोड, औरंगजेब लेनचे अब्दुल कलाम लेन, हुमायून रोडचे महर्षी वाल्मिकी रोड आणि शाहजहान रोडचे नाव बदलून जनरल बिपीन सिंग रावत असे ठेवावे, अशी सूचना केली आहे.

Akbar Road
आता देशात होणार डिजिटल जनगणना - अमित शाह

तसेच, बाबर लेनचे नाव स्वातंत्र्यसेनानी खुदीराम बोस यांच्या नावावर करावे, असेही दिल्ली भाजप प्रमुखांनी सुचवले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस (Congress) पक्षाचे मुख्यालय 24, अकबर रोडवर आहे.

दुसरीकडे, अशा बदलांना नवी दिल्ली (Delhi) नगरपरिषद (NDMC) च्या पॅनेलने मान्यता दिली आहे. मध्य दिल्लीचे रस्ते स्थानिक संस्था NDMC च्या अखत्यारीत येतात आणि राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची कार्यालये आणि निवासस्थाने देखील याच भागात येतात. अशा विनंत्या NDTV कौन्सिलसमोर ठेवल्या जातात, NDMC चेअरमन यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यीय मंडळ असते.

Akbar Road
Union Budget 2021: देशात प्रथमच डिजिटल जनगणना होणार

नियमानुसार, नाव बदलण्याच्या विनंतीचा विचार करताना, इतिहास आणि भावना तसेच महापुरुष असे लक्षात ठेवण्यास पात्र आहे की नाही. परंतु NDMC च्या नियमानुसार नाव बदलणे हा अपवाद असावा.

दुसरीकडे, 2014 मध्ये केंद्रात भाजपची (BJP) सत्ता आल्यापासून, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यांमध्ये नावे बदलण्याच्या हालचालींना वेग आला. त्यानंतर राज्यांसह देशातील राजकारण्यांना भांडणासाठी नवा मुद्दा मिळाला. 2015 मध्ये औरंगजेब रोडचे नामकरण माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले. वर्षभरानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानासाठी प्रसिद्ध असलेल्या रेसकोर्स रस्त्याचे लोककल्याण मार्ग असे नामकरण करण्यात आले.

Akbar Road
बंगाल निवडणुकीबद्दल अमित शाह यांचा मोठा दावा 

याशिवाय, नाव बदलण्यावर इतिहासकारांचा आक्षेप आहे. नावं बदलणं म्हणजे म्हणजे इतिहासाशी छेडछाड आहे, असे मत काही इतिहासकारांनी नोंदवले आहे. परंतु भाजपने या मुद्याला राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या प्रश्नाशी जोडले असून, मुघल आणि वसाहती काळातील गुलामगिरीची प्रतीके नष्ट करण्यात यावीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com