दहशतवाद्यांचा कट, जम्मू काश्मीरात हाय अलर्ट

कटाचा खुलासा होताच सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीरात (Jammu Kashmir) पुन्हा एकदा पोलीस आणि लष्करासाठी अलर्ट जारी केला असून
Terrorist organizations plans to attack Jammu Kashmir on high alert 

Terrorist organizations plans to attack Jammu Kashmir on high alert 

Dainik Gomantak

Published on
Updated on

शस्त्र खाली करून मुख्य प्रवाहात सामील झालेल्या माजी दहशतवाद्यांना पुन्हा कथित जिहादच्या (Jihad) नावाखाली बंदुका हाती घेण्यास प्रवृत्त केले जात असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्यातच पाकिस्तानात (Pakistan) बसलेल्या दहशतवादी संघटनांचे नेते त्यांना तसे करण्यास सांगत आहेत हे देखील आता उघड झाले आहे. दहशतवादी संघटनांचे (Terrorist Organization) कमांडर या माजी दहशतवाद्यांशी सतत संपर्क साधत आहेत आणि त्यांना पुन्हा दहशतवादात सामील होण्यास सांगत आहेत. यातील काही माजी दहशतवाद्यांनी ही माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली आहे. या कटाचा खुलासा होताच सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीरात (Jammu Kashmir) पुन्हा एकदा पोलीस आणि लष्करासाठी अलर्ट जारी केला असून अशा आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. (Terrorist organizations plans to attack Jammu Kashmir on high alert )

नुकताच हा खुलासा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे . खुद्द जम्मू भागात कुटुंबासोबत सामान्य जीवन जगणाऱ्या माजी दहशतवाद्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानात बसलेल्या दहशतवादी संघटनेचा कमांडर सतत त्याच्या संपर्कात असल्याचे त्याने सांगितले आहे . त्यांच्यावर पुन्हा दहशतवादी गटात सामील होण्यासाठी दबाव टाकला जात आहे. एका वृत्तसंस्थेनेही याचा हवाला दिला आहे.पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुलाम काश्मीरच्या बिम्बर भागात हिजबुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या टॉप कमांडरसोबत गुप्त बैठक घेतल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीर तसेच जम्मूमध्ये दहशतवादी कारवाया वाढवणे हा या बैठकीचा उद्देश होता. त्यासाठी आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांची मदत घेण्यावरही भर देण्यात आला आहे.

<div class="paragraphs"><p>Terrorist organizations plans to attack Jammu Kashmir on high alert&nbsp;</p></div>
पाकिस्तान रचतोय भारताविरुध्द नापाक कट, नवीन दहशतवादी संघटनांची स्थापना

गेल्या महिन्यात पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत मारला गेलेला पाकिस्तानी दहशतवादी आरिफ असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यासाठी त्याला येथे पाठवण्यात आले होते. माजी दहशतवाद्यांशी संपर्क साधून त्यांना पुन्हा दहशतवादाचा मार्ग अवलंबण्यास भाग पाडण्याची जबाबदारी आयएसआयने त्याच्यावर सोपवली होती. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर हा सर्व बेत फसला.लष्करी सूत्रांनी सांगितले की, आरिफने आत्मसमर्पण केलेल्या काही दहशतवाद्यांशीही संपर्क साधला होता, ज्यांनी दहशतवाद्यांच्या या कटाची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांना दिली होती.

आता दहशतवादी संघटनांनी माजी दहशतवाद्यांशी संपर्क साधून त्यांना पुन्हा दहशतवादाचा मार्ग अवलंबण्यास प्रवृत्त करणे सुरू केले आहे. या कटाची वेळीच माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी पोलीस आणि लष्करालाही माजी दहशतवाद्यांशी संपर्क साधून याबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com