Terrorist organization TRF warns to NIA
Terrorist organization TRF warns to NIADainik Gomantak

'आता अधिक विनाशासाठी तयार राहा', दशतवाद्यांची थेट NIA ला धमकी

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवाईमुळे निराश झालेल्या टीआरएफ (TRF) या दहशतवादी संघटनेने आता थेट NIA लाच धमकी दिली आहे.
Published on

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) लष्कराच्या कारवाईमुळे निराश झालेल्या दहशतवाद्यांनी (Terrorists Attack) गेल्या काही दिवसांत बिगर काश्मिरी लोकांना ठार केलेले पाहायला मिळत आहेत. यानंतर राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (NIA) काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी संघटनांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. या कारवाईमुळे निराश झालेल्या टीआरएफ (TRF) या दहशतवादी संघटनेने आता थेट NIA लाच धमकी दिली आहे. कारण मागील बऱ्याच दिवसापासून एनआयए टीआरएफच्या अनेक ठिकाणांवर सतत छापे मारत आहे.

Terrorist organization TRF warns to NIA
...अन् तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार; ओवेसींचा पंतप्रधानांना सवाल

टीआरएफ या संघटनेचा प्रमुख पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदचा जावई आहे. एनआयएला धमकी देऊन टीआरएफने गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. TRF ने IA ला सांगितले की ते त्यांच्या दहशतवादी कारवाया वाढवत आहेत. आणि NIA ने आता अधिक विनाशासाठी तयार रहावे अशी धमकी दिली दहशतवादी संघटना देत आहे.

तर दुसरीकडे आजही एनआयएने काश्मीरच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात श्रीनगरमधील काही घरांचाही समावेश आहे. ज्या भागात छापे टाकण्यात आले आहेत त्यामध्ये श्रीनगरमधील ईदगाह आणि चानपुरा वगळता कुलगाम, बारामुल्ला आणि सोपोर यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या एकूण 11 ठिकाणी छापेमारी सुरू आहे.

दरम्यान मागील बऱ्याच दिवसांपासून दहशतवादाने काश्मीर खोऱ्यात पुन्हा तोंड काढायला सुरूवात केली आहे, 5 ऑक्टोबर रोजी प्रमुख काश्मिरी पंडित आणि श्रीनगरच्या सर्वात प्रसिद्ध फार्मसीचे मालक माखन लाल बिंद्रू यांची दहशतवाद्यांनी त्यांच्या दुकानात गोळ्या घालून हत्या केली होती. दोन दिवसांनंतर सरकारी शाळेत सुपिंदर कौर आणि दीपक चंद यांची हत्या करण्यात आली होती विशेष म्हणजे ते दोघेही शिक्षक होते.ज्या दिवशी बिंद्रूची हत्या झाली त्या दिवशी बिहारचे चाट विक्रेता वीरेंद्र पासवान आणि टॅक्सी चालक मोहम्मद शफी लोन यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com