
जगाला 2025 च्या सुरुवातीला अनेक वर्षांच्या अशांततेनंतर शांतता अपेक्षित होती. परंतु वर्षाच्या मध्यापर्यंत शांततेची आशा तणाव आणि अनिश्चिततेत बदलली. जगभरात संघर्ष आणि संकटांची मालिका सुरु झाली. भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर मध्यपूर्वेत इस्त्रायल आणि इराण यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. या दोन्ही देशातील संघर्षाची चुणूक जानेवारीमध्येच दिसू लागली होती. आता या संघर्षाने युद्धाचे रुप धारण केले. याचदरम्यान आता अनेक ज्योतिषांनी आतापर्यंत पाहिलेल्यापेक्षाही मोठ्या संघर्षाची शक्यता वर्तवली.
टीआरएस एपिसोड दरम्यान स्वामी योगेश्वरानंद गिरी यांनी सांगितले की, आताची एकंदरीत परिस्थिती पाहता जागतिक युद्ध होऊ शकते. मात्र भारतासाठी हा सुवर्णकाळ ठरु शकतो. दरम्यान, ही आतापर्यंत केलेली ही एकमेव भविष्यवाणी नाही. आणखी एक भारतीय ज्योतिषी कुशल कुमार जे "इंडियन नोस्ट्राडेमस" म्हणून ओळखले जातात. त्यांनीही तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवली होती. त्यांनी गेल्या वर्षी ही शक्यता वर्तवली होती. यापूर्वी, कुशल यांनी रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्षाची शक्यता वर्तवली होती. दोन्ही देशात युद्ध सुरु होण्यापूर्वी त्यांनी ही शक्यता वर्तवली होती.
दुसरीकडे, जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या घटनांचे भाकित करणारे केवळ भारतीयच नाहीत. शतकांपूर्वी, फ्रेंच ज्योतिषी आणि वैद्य नॉस्ट्राडेमस यांनीही 2025 मध्ये घडणाऱ्या अनेक प्राणघातक घटनांची भविष्यवाणी केली होती, ज्यामध्ये प्लेग, लघुग्रहांची टक्कर आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे पतन यांचा समावेश होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर अनेक ज्योतिषी आता नजीकच्या भविष्यात एका मोठ्या संघर्षाची शक्यता वर्तवत आहेत.
इंडिया टुडेने ज्योतिषी पंडित अरुणेश कुमार शर्मा यांच्याशी अलिकडच्या घटनांभोवती असलेल्या अराजकतेबद्दल त्यांचे मत जाणून घेण्यासाठी चर्चा केली. शर्मा यांच्या मते, जागतिक नेत्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय आणि ग्रहांचा प्रभाव दोन्ही सार्वजनिक अशांततेला कारणीभूत ठरु शकतात. येणारा महिना संवेदनशील असून सावधगिरी बाळगण्याची गरज भासू शकते.
जून आणि जुलै महिन्यात जागतिक स्तरावर अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान युद्धे, अपघात आणि नैसर्गिक आपत्ती वाढतील. 7 जून ते 28 जुलै दरम्यान मंगळ आणि केतू ग्रहांच्या संरेखनामुळे लपलेल्या धोक्यांचा विस्फोट होऊ शकतो. भूकंप, आग, युद्धासह इतर मोठ्या घटना घडू शकतात. जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान असाच धोकादायक काळ पुन्हा येऊ शकतो. 12 जूनचा विमान अपघात, इराण-इस्रायल युद्ध, भारतातील दहशतवादी हल्ला आणि हेलिकॉप्टर अपघात यासारख्या घटना या उदाहरण आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.