"मग जय शाह कोण आहेत...": PM मोदींच्या आरोपावर KCR यांच्या पक्षाचा 'पलटवार'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गुरुवारी तेलंगणातील हैदराबाद शहरात एका सभेत राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी तेलंगणातील हैदराबाद शहरात एका सभेत राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, तेलंगणाचा संघर्ष हा केवळ एका कुटुंबाच्या सत्तेसाठी नव्हता. (Telangana CM KCR's party has responded to Prime Minister Narendra Modi's allegations)

दरम्यान, राज्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी (Prime Minister Narendra Modi) पुढे म्हणाले, "राजकीय घराणेशाहीमुळे देशातील तरुणांना राजकारणात येण्याची संधीही मिळत नाही. अशा तरुणांच्या स्वप्नाचा चुराडा करुन त्यांना राजकारणात येण्यापासून रोखले जाते. घराणेशाहीपासून स्वातंत्र्य हा 21 व्या शतकातील भारताचा (India) संकल्प आहे."

Prime Minister Narendra Modi
'...तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा करतात': PM मोदींनी KCR सरकारवर साधला निशाणा

यावर आता सीएम केसीआर यांच्या पक्षाने प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाने म्हटले आहे की, 'पीएम मोदी देशाच्या पंतप्रधानांसारखे बोलले नाहीत तर भाजपच्या नेत्यासारखे बोलले.'

टीआरएसचे प्रवक्ते कृशांक माने म्हणाले, "पंतप्रधानांनी फक्त कुटुंबवादाबद्दल बोलले. तसे असेल तर भारतीय क्रिकेटचे नेतृत्व करणारे जय शहा (Of Union Minister Amit Shah) कोण आहेत (Son)? घराणेशाहीवर विश्वास नसेल तर राजनाथ सिंह आणि त्यांच्या मुलाची हकालपट्टी करावी. तुम्ही फक्त तेलंगणाबद्दल बोलता? जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांचे पुत्र आहेत.''

Prime Minister Narendra Modi
'...काश्मिरींना यासिन मलिकने दहशतवादी बनवले'

दुसरीकडे, सीएम केसीआर यांनीही पीएम मोदींवर जोरदार हल्ला चढवला. बेंगळुरुमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधानांच्या 'हल्ला'ला केवळ भाषण म्हणून फेटाळून लावले.

देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष वेधत ते पुढे म्हणाले, "परिस्थिती दिवसेंदिवस बिकट चालली आहे, मात्र दररोज भाषणे दिली जात आहेत. जीडीपीत मोठी घसरण होत आहे. महागाई वाढत आहे... देश बदलला पाहिजे."

कौटुंबिक पक्ष केवळ स्वत: ला समृद्ध करतात

मोदी पुढे म्हणाले, "तेलंगणातील (Telangana) लोक हे पाहत आहेत की, जेव्हा एका कुटुंबाला समर्पित असणारा पक्ष सत्तेवर येतो, तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य भ्रष्टाचाराचा (Corruption) सर्वात मोठा चेहरा बनतात. तेलंगणातील लोक हे ही पाहत आहेत की, कुटुंबातील सदस्य स्वत:ची भरभराट करतात. आणि तिजोरी भरतात."

Prime Minister Narendra Modi
यासिन मलिकच्या शिक्षेविरोधात दिल्ली-NCR मध्ये हाय अलर्ट, दहशतवादी हल्ल्याची शक्यता

पंतप्रधानांनी पुढे अधोरेखित केले की, जेव्हा राजकीय घराणेशाही संपुष्ठात येईल, तेव्हा विकासाचे मार्ग खुले होतील. ते पुढे म्हणाले, "आता ही मोहीम पुढे नेण्याची जबाबदारी माझ्या तेलंगणातील बंधू-भगिनींची आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com