'स्पीकरसाहेब दोन मिनिटे मला एकांतात भेटा मग...', लालूंच्या ज्येष्ठ पुत्राने व्यक्त केली इच्छा

लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांना विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांची दोन मिनिटे एकांतात भेट घ्यायची आहे.
Tej Pratap Yadav
Tej Pratap YadavDainik Gomantak

Tej Pratap Yadav: बिहार विधानसभेतील हसनपूरचे आमदार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांना विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांची दोन मिनिटे एकांतात भेट घ्यायची आहे. पाटणा येथील विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रसारमाध्यमांसमोर आलेले तेज प्रताप यादव म्हणाले की, 'मला दोन मिनिटे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांना दोन मिनिटे एकांतात भेटायचे आहे.' पत्रकारांनी कोणत्या विषयावर भेटायचे आहे, असे विचारले असता, तेज प्रताप यादव म्हणाले की, काही वैयक्तिक विषय आहे, दोन मिनिटे भेटायचे आहे. वाटेत पत्रकारांशी हसत ते पुढे म्हणाले, 'तुम्हाला दोन मिनिटांचा अर्थ आधीच माहित आहे.'

दरम्यान, पत्रकारांना त्याचा अर्थ कळतो असे सांगून तेज प्रताप यादव दोन मिनिटे हसले. पत्रकार वेद प्रकाश काही वेळापूर्वी तेज प्रताप यादव यांची मुलाखत घेण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी त्यांना माईक, कॅमेरा बाजूला ठेवून दोन मिनिटे चालण्यास सांगितले. यादरम्यान तेज प्रताप वेदप्रकाश यांचे स्टिंग ऑपरेशन करत होते.

Tej Pratap Yadav
PM Modi ‘उद्यमी भारत’ कार्यक्रमात घेणार भाग, एमएसएमई क्षेत्राला गती देण्यासाठी करणार योजना सुरू

तसेच, तेज प्रताप दोन मिनिटे बोलत असताना, वेदप्रकाश काही तरी अनुचित होण्याच्या अपेक्षेने तेथून त्यांच्या कारमधून निघून जाताता. ज्यांच्या मागे तेज प्रताप माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jeetan Ram Manjhi) यांच्या निवासस्थानापर्यंत जातात.

दुसरीकडे, तेज प्रताप यादव यांनी आरोप केला होता की, माजी मुख्यमंत्री मांझी यांच्या सांगण्यावरुन आपली आणि यादव कुटुंबाची बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले जात होते. काही पत्रकारांनी मांझी यांच्याबरोबर संगनमत केले आहे.

Tej Pratap Yadav
नौदल सप्ताहाचा एक भाग म्हणून शालेय मुलांनी गोवा नौदल क्षेत्राला भेट दिली

तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'माझ्या दोन मिनिटांचा अर्थ असा होतो की, दारात आलेल्या माणसाचा मला आदर करायचा होता, त्यांना रसगुल्ला खावू घालायचा होता, समोसे खायला द्यायचे होते, त्यांना मिठाई खायला द्यायची होती.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com