Team India New Jersey Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा 'जर्सी स्पॉन्सर', प्रत्येक सामन्यासाठी BCCIला देणार 4.5 कोटी

Apollo Tyres Team India New Jersey Sponsor: भारतीय क्रिकेट संघाला एक नवीन जर्सी प्रायोजक मिळाला आहे. हो, अपोलो टायर्स आता भारतीय क्रिकेट संघाचा नवीन जर्सी प्रायोजक बनला आहे.
Team India New Jersey Sponsor
Team India New Jersey SponsorDainik Gomantak
Published on
Updated on

Apollo Tyres Team India New Jersey Sponsor

भारतीय क्रिकेट संघाला नवीन जर्सी स्पॉन्सर मिळाला आहे. अपोलो टायर्सने (Apollo Tyres) प्रायोजकत्वाची बोली जिंकत भारतीय संघाचा अधिकृत जर्सी स्पॉन्सर म्हणून करार केला आहे. हा करार तीन वर्षांसाठी म्हणजेच २०२७ पर्यंत लागू राहणार आहे. अपोलो टायर्स यासाठी बीसीसीआयला (BCCI) मोठी रक्कम देणार आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय क्रिकेटपटू अपोलो टायर्सचा लोगो असलेली नवी जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) नवा जर्सी स्पॉन्सर मिळाला असून अपोलो टायर्सने ही मोठी संधी मिळवली आहे. या कराराअंतर्गत अपोलो टायर्स बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी तब्बल ४.५ कोटी रुपये देणार आहे.

आंतरराष्ट्रीय सामने, द्विपक्षीय मालिका तसेच ICC स्पर्धांमधील जर्सीवर अपोलोचा लोगो झळकणार असल्याने कंपनीला ब्रँड प्रमोशनसाठी भक्कम व्यासपीठ उपलब्ध होईल.

Team India New Jersey Sponsor
Goa SAG: ‘साग’मधील जंगी स्‍वागतामुळे संचालक गावडे वादात, कारणे दाखवा नोटिस; गावडे - तवडकर वादाची चर्चा

ड्रीम११ ने जुलै २०२३ मध्ये बीसीसीआयसोबत ३५८ कोटी रुपयांचा मोठा करार केला होता. याअंतर्गत, ड्रीम११ ने भारतीय महिला संघ, भारतीय पुरुष संघ, भारत अंडर-१९ संघ आणि भारत-अ संघाच्या किट्ससाठी प्रायोजक हक्क मिळवले होते. याआधी ही जागा बायजू या कंपनीकडे होती, परंतु नंतर ड्रीम११ने तिची जागा घेतली होती.

Team India New Jersey Sponsor
Goa Shack Policy: शॅक्सच्या ‘सबलेटिंग’ प्रकरणांचा पुनर्विचार होणार! मंत्री खंवटेंनी दिली माहिती; 23 परवान्यांचे होणार नूतनीकरण

२०२५ च्या आशिया कपमध्ये टीम इंडिया टायटल स्पॉन्सरशिवाय खेळत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यूएईच्या भूमीवर शानदार कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात यूएईला ९ विकेट्सने हरवल्यानंतर, सूर्याच्या सेनेने भव्य सामन्यात पाकिस्तानला ७ विकेट्सने हरवले.

गोलंदाजीत कुलदीप यादवची जादू शिगेला पोहोचली आहे, तर अक्षर आणि वरुणही उत्तम फॉर्ममध्ये दिसले आहेत. त्याच वेळी, अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीत गोलंदाजांचा चांगला हिशेब दिला आहे. सूर्यकुमार पहिल्यांदाच आशिया कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com