
Nitish Kumar Reddy Against Case Filed
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी सध्या दुहेरी संकटाला सामोरा जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाल्यानंतर सरावादरम्यान दुखापत झाल्यामुळे त्याला मालिकेबाहेर जावं लागलं. मात्र, आता त्याच्यावर ५ कोटींपेक्षा जास्त रकमेची थकबाकी न भरल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
हा आरोप बंगळुरूस्थित स्क्वेअर द वन या टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीने केला असून, त्यांनी त्याच्याविरोधात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात नितीशने स्वतः दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असल्याचं समजते.
नितीश रेड्डी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती, परंतु सरावादरम्यान दुखापत झाल्यानंतर त्यांना संघातून वगळण्यात आले. आता तो एका नवीन अडचणीत अडकला आहे.
रिपोर्ट्सनुसार, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान नितीश रेड्डी आणि त्यांची माजी मॅनेजमेंट एजन्सी स्क्वेअर द वन यांच्यात कशावरून तरी वाद झाला होता. त्यानंतर, टीम इंडियाच्या या अष्टपैलू खेळाडूने संघातील एका क्रिकेटपटूच्या मदतीने एका नवीन मॅनेजमेंट एजन्सीसोबत करार केला, तर नितीशचा स्क्वेअर द वनसोबत ३ वर्षांचा करार होता.
वृत्तानुसार, स्क्वेअर द वन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक शिव धवन यांनी नितीश रेड्डी यांच्यावर कराराचे उल्लंघन केल्याचा आणि थकबाकी न भरल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली. त्याची सुनावणी सोमवार, २८ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकरणात नितीश कुमार रेड्डी न्यायालयात जाण्यासही तयार आहे. वृत्तानुसार, त्याचा दावा आहे की त्यांनी स्वतःच एंडोर्समेंट डील मिळवली होती. त्यात एजन्सीची कोणतीही भूमिका नव्हती. तथापि, या प्रकरणात नितीश रेड्डीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान त्याला गुडघ्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो संघाबाहेर होता आणि तो भारतात परतला आहे. नितीश रेड्डी यांना इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ४५ धावा केल्या आणि तीन विकेट घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.