"जर पैगंबर आज हयात असते तर...": बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नुपूर शर्मांच्या वक्तव्यावर अनेक शहरांमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनावर निषेध व्यक्त केला आहे.
Taslima Nasreen
Taslima NasreenDainik Gomantak
Published on
Updated on

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नुपूर शर्मांच्या वक्तव्यावर अनेक शहरांमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनावर निषेध व्यक्त केला आहे. यासोबतच तस्लिमा यांनी प्रेषित मुहम्मद यांचा उल्लेख करत हिंसक आंदोलन करणाऱ्यांना सल्लाही दिला आहे. तस्लिमा नसरीन यांनी सोशल मिडियावर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'जर मुहम्मद पैंगबर आज हयात असते तर जगभरातील मुस्लिम कट्टरतावाद्यांचा वेडेपणा पाहून त्यांना धक्का बसला असता.'

दरम्यान, कट्टरपंथी संघटनांकडून जीवे मारण्याची धमक्या मिळाल्याने तस्लिमा नसरिन यांना 1994 मध्ये बांगलादेश सोडावा लागला. तस्लिमा यांच्याकडे स्वीडिश नागरिकत्व असूनही त्या गेली दोन दशके यूएस आणि युरोपमध्ये वास्तव्यास आहेत.

Taslima Nasreen
पैगंबर विवाद: तोडफोडीनंतर भाजप कार्यालयाला आग, हावडामध्ये उडाली खळबळ

दुसरीकडे, बहुतेक वेळा शॉर्ट रेजिडेंसी परमिटवर त्या भारतात येतात. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्या वक्तव्यावरुन देशभरात निदर्शने आणि कोलकाताजवळील (Kolkata) हावडासह काही शहरांमध्ये झालेल्या चकमकींनंतर दोन जण ठार झाले आहेत. तर अनेकांना अटक करण्यात आली आहे.

तसेच, भाजप (BJP) नेत्यांनी पैगंबरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. अनेक पश्चिम आशियाई देशांनी भारताचा निषेध केला आहे. त्यांनी भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचेही आवाहन केले आहे. गुरुवारी दिल्ली (Delhi) पोलिसांनी सांगितले की, आम्ही नुपूर शर्मा आणि इतरांविरुद्ध सोशल मीडियावर “लोकांच्या भावना भडकावल्याबद्दल” तक्रार दाखल केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com