Watch Video: डोळ्यात पाणी अन् मनात पराभवाचं दुःख! डीएमके कार्यकर्त्याचा फुटला टाहो; सोशल मीडियावर इमोशनल व्हिडिओ व्हायरल

DMK Worker Crying Video Viral: सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाची झालेली पिछेहाट पाहून एका निष्ठावान कार्यकर्त्याचा कॅमेऱ्यासमोर टाहो फुटला.
DMK Worker Crying Video Viral
DMK Worker Crying Video ViralDainik Gomantak
Published on
Updated on

DMK Worker Crying Video Viral: तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 च्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलानं संपूर्ण देशाला थक्क करणारा निकाल समोर आणला. या निवडणुकीत सुपरस्टार विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाने पहिल्याच प्रयत्नात दमदार कामगिरी करत मोठी आघाडी घेतली. दुसरीकडे, सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाची झालेली पिछेहाट पाहून एका निष्ठावान कार्यकर्त्याचा कॅमेऱ्यासमोर टाहो फुटला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार, अभिनेता विजय यांचा 'टीव्हीके' पक्ष 124 जागांवर आघाडीवर असून त्यांनी बहुमताचा टप्पा ओलांडला. दुसऱ्या क्रमांकावर एआयएडीएमके 72 जागांवर आघाडीवर आहे, तर सत्ताधारी डीएमके केवळ 38 जागांवर मर्यादित राहताना दिसत आहे. आपल्या पक्षाची ही दयनीय अवस्था पाहून एका डीएमके कार्यकर्त्याला आपले अश्रू अनावर झाले. तो माध्यमांशी बोलताना इतका भावूक झाला की त्याच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. त्याने आपल्याजवळील गमछ्याने अश्रू पुसले आणि पक्षाच्या पीछेहाटीवर निराशा व्यक्त केली.

DMK Worker Crying Video Viral
Tamil Nadu Bus Crash: तामिळनाडूमध्ये दोन बसेसची समोरासमोर टक्कर, 11 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

यावेळची तामिळनाडूची (Tamil Nadu) निवडणूक त्रिकोणीय मानली जात होती, ज्यामध्ये 'टीव्हीके'ने अनपेक्षित मुसंडी मारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. व्हायरल होत असलेल्या या कार्यकर्त्याच्या व्हिडिओवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत असून अनेकजण त्याच्या पक्षाप्रती असलेल्या निष्ठेबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत. सध्या हे केवळ सुरुवातीचे कल असले तरी, तामिळनाडूच्या राजकारणात मोठे सत्तांतर घडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत, ज्याने राजकीय कार्यकर्त्यांच्या भावनांनाही वाट मोकळी करुन दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com