Avimukteshwaranand On Hindu Rashtra
ज्योतिषी पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नुकतेच एक मोठे विधान केले आहे. आम्हाला आमच्या कल्याणासाठी हिंदू राष्ट्र नाही तर रामराज्य हवे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
हिंदू राष्ट्राच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. आज आम्हाला हिंदू राष्ट्राची नव्हे तर रामराज्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ज्योतिषी पीठाधीश्वर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुढे म्हणतात की आम्हाला हिंदू राष्ट्राचा फायदा होणार नाही, आम्हाला रामराज्य हवे आहे. यामुळे लोकांचा धर्मनिरपेक्ष राष्ट्राविषयी भ्रमनिरास होत असल्याचे त्यांचे मत आहे. सध्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात हिंदू राष्ट्राची मागणी करणे योग्य होणार नाही.
शंकराचार्यांच्या मते, भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली पण आजपर्यंत हिंदुना त्यांच्या धर्माविषयी शिक्षण देण्याचा अधिकार मिळालेला नाही. मात्र दुसरीकडे अल्पसंख्याकांना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते त्यांच्या धर्माविषयीची माहिती शाळांमध्ये देऊ शकतात. मात्र आपल्याला त्यासाठी मुभा नाही.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी पत्रकारांशी चर्चा करताना देशात निर्माण होणाऱ्या हिंदू राष्ट्राच्या मागणीच्या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया देताना याविषयीचे मत मांडले. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती दोन दिवसांच्या छिंदवाडा दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, यावर आपले मत मांडत त्यांनी रामराज्याच्या मागणीवर भर दिला. त्यांच्या मते सध्या हिंदुंचे ध्रुवीकरण हा राजकारण्यांचा मते मते मिळवण्याचा एक मार्ग आहे. राजकारण्यांना हिंदू राष्ट्र म्हणजे फक्त हिंदूंचे एकत्रीकरण, दुसऱ्या धर्माच्या लोकांशी चुकीचे वागणे, त्यांच्यावर अन्याय करणे असे वाटते. हिंदू राष्ट्रापासून कल्याण होणार नाही, असे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे मत आहे. त्यांना रामराज्य हवे आहे.
बडी माता मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी करण्यासाठी शंकराचार्य छिंदवाडा येथे पोहोचले आहेत. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे छिंदवाडा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. खरे
तर याच वर्षी मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधी छतरपूरच्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री सातत्याने हिंदू राष्ट्राची मागणी करत आहेत. मध्यप्रदेश आणि अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ते भागवत कथा सांगत आहेत. धीरेंद्र शास्त्री यांची कथा ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने पोहोचत आहेत.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मागे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. खरे तर शास्त्री अनेक चमत्कारांचा दावा करत आहेत. त्यांच्या या दाव्यावर शंकराचार्यांनी मागे म्हटले होते की, त्यांच्यात एवढी शक्ती असेल तर त्यांनी जोशीमठातील घरातील तडे भरावेत, आम्ही त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करू.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.