Goa Theater
Goa TheaterDainik Gomantak

Suprime Court: थिएटरमध्ये स्वतःचे खाद्यपदार्थ नेण्याबाबतचा निर्णय चित्रपटगृहांचा- सुप्रीम कोर्टाची भूमिका

जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये स्वतःचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची मुभा दिली होती.
Published on

Suprime Court: सिनेमागृहांचे मालक हे प्रत्यक्ष सिनेमागृहांमध्ये कोणते खाद्यपदार्थ विकायचे याचे नियम निश्चित करू शकतात. जी मंडळी सिनेमा पाहायला येतात त्यांच्याकडे संबंधित वस्तू खरेदी न करण्याचा पर्याय असतो, असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने सिनेमागृह चालकांनी कोणत्याही शुल्काशिवाय प्रेक्षकांना पेयजल उपलब्ध करून द्यावे असे सांगितले.

तत्पूर्वी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये स्वतःचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची मुभा दिली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा तो निकाल देखील रद्दबातल ठरविला आहे.

Goa Theater
Mopa Airport: मोपा विमानतळासाठी ‘कदंब’ची बससेवा उद्यापासून

या निर्णायामुळे देशभरात चर्चांना उधाण आले आहे. सिनेमाप्रेमी यावर आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे देत आहेत. परंतू सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अंतिम असल्याने त्याचे पालन सर्वांवर बंधनकारक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com