लग्नाचे वचन देऊन बलात्कार! लग्नाला होकार दिल्यानंतर SC ने रद्द केली शिक्षा; कोर्टातच द्यायला लावले फूल

Supreme Court Decision: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ०५ सप्टेंबर २०२४ रोजी संशयित व्यक्तीची शिक्षा रद्द करण्यास नकार देत त्याचा अर्ज फेटाळला होता.
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: लग्न करण्यास होकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संशयित पुरुषावरील बलात्काराची शिक्षा रद्द केली. लग्नाचे वचन देऊन पीडित महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. लग्नास होकार दिल्यानंतर ही शिक्षा रद्द करण्यात आली. जोडप्याला कोर्टातच ऐकमेकांना फूलाचे आदान - प्रदान करण्यास सांगितले.

न्यायमूर्ती बी. वी. नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या हा निर्णय दिला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत आम्ही दोघांशी संवाद साधला. यानंतर दोघांनी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर संशयित पुरुषाला कोर्टातच पीडितेशी लग्न करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवण्यास सांगितले.

Supreme Court
IAS IPS Transfer: लईराई चेंगराचेंगरी घटनेनंतर बदली केलेल्या जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांची आता गोव्याबाहेर बदली

"बलात्काराच्या आरोपातील संशयित आणि पीडित महिला ऐकमेकांशी लग्न करण्यास तयार आहेत. लग्नाची सविस्तर चर्चा दोघांच्या पालकांकडून केली जाईल. दोघांचा विवाह लवकरच होईल अशी आम्हाला आशा आहे. यामुळे आम्ही संशयिताची शिक्षा रद्द करुन त्याची सुटका करत आहोत", असे कोर्टाने हा निर्णय देताना म्हटले आहे.

दरम्यान, संशयिताला पुन्हा तुरुंगात पाठवले जाणार असून, लवकरात लवकर सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. सत्र न्यायालयास उचित वाटले तर तर त्याची जामिनावर सुटका करतील, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जुलै पर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ०५ सप्टेंबर २०२४ रोजी संशयित व्यक्तीची शिक्षा रद्द करण्यास नकार देत अर्ज फेटाळला होता. त्यानंतर संशयिताने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी २०२१ मध्ये गुन्हा नोंद झाला होता. लग्नाचे वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.

Supreme Court
Goa: दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतून 14,000 अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळली; 39 कोटी रुपये केले वसूल

दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, संशयित आणि पीडित महिलेची फेसबुकवरुन ओळख झाली होती. यावरुन दोघांत मैत्री व पुढे शारीरिक संबंध देखील झाले. दरम्यान, संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला होता.

आईला मान्य नसल्याचे कारण देत त्याने पीडितेशी लग्नास नकार दिला होता. ट्रायल कोर्टाने संशयिताला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवले होते. बलात्कारासाठी दहा आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली दोन असे बारा वर्षांची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली होती. दरम्यान, उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्याने त्यांने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Couple Caned For Adultery In Indonesia
POCSO Case Goa
Tarun Tejpal Supreme Court
Goa High Court Premature Release
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com