Supreme Court: बेनामी संपत्तीबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय, नाममात्र मालकाला तुरुंगात जावे लागणार नाही

ही मालमत्ता ज्याच्या नावावर घेतली आहे, तो त्याचा केवळ नाममात्र मालक असतो, तर खरी मालकी त्या मालमत्तेसाठी पैसे भरलेल्या व्यक्तीची असते.
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Supreme Court : बेनामी मालमत्ता (illegal property) कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी म्हणजेच आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, बेनामी मालमत्ता कायदा-2016 मध्ये केलेली दुरुस्ती योग्य नाही. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत बेनामी संपत्तीप्रकरणी तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेचा कायदा रद्द केला आहे. बेनामी व्यवहार कायदा, 2016 च्या कलम 3(2) मध्ये ही तरतूद करण्यात आली आहे. हे कलम स्पष्टपणे मनमानी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

2016 च्या कायद्यानुसार सरकारला दिलेली मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार पूर्वलक्षी असू शकत नाही, म्हणजेच जुन्या प्रकरणांमध्ये 2016 च्या कायद्यानुसार कारवाई करता येत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Supreme Court
खोट्या केसेसमध्ये अडकलेल्या लोकांना नुकसान भरपाई देण्यास SC ने दिला नकार

बेनामी मालमत्ता म्हणजे काय?

बेनामी मालमत्ता ही अशी मालमत्ता आहे, जी दुसऱ्याने खरेदी केलेली असते, परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असते ही मालमत्ता पत्नी, मुले किंवा नातेवाईकांच्या नावावरही खरेदी केली असते. ज्या व्यक्तीच्या नावावर अशी मालमत्ता खरेदी केली जाते त्याला 'बेनामदार' म्हणतात.

Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर FIFA उठवू शकते AIFF वरील बंदी

बेनामी संपत्तीचा हक्क कोणाला आहे?

ही मालमत्ता ज्याच्या नावावर घेतली आहे, तो त्याचा केवळ नाममात्र मालक असतो, तर खरी मालकी त्या मालमत्तेसाठी पैसे भरलेल्या व्यक्तीची असते. बहुतेक लोक आपला ब्लॅक मनी किंवा गैरव्यवहार लपवण्यासाठी हि संपत्ती खरेदी करून दुसऱ्याच्या नावाने ठेवतात. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने काळ्या पैशाचे व्यवहार संपवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यामुळे 'बेमानी प्रॉपर्टी'ही चर्चेत राहिली. तसेच बेनामी संपत्तीची प्रकरणे कमी करण्यासाठी अनेक योजनाही आखण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com