Delhi Green Diwali: दिल्लीत हरित दिवाळी! सर्वोच्च न्यायालयाकडून फटाके फोडण्यास ठराविक वेळेत परवानगी; कडक निर्बंध जारी

Supreme Court Diwali Order: देशाची राजधानी दिल्लीमध्ये दिवाळीच्या काळात हरित फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज परवानगी दिली.
Supreme Court Diwali Order
Delhi Green DiwaliDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये दिवाळीच्या काळात हरित फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज परवानगी दिली. सात आणि आठ नोव्हेंबर रोजी निर्धारित वेळेत म्हणजे सकाळी सहा ते सात आणि रात्री आठ ते दहा या वेळेत लोकांना हरित फटाके फोडता येतील, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या वेळेशिवाय अन्य वेळी फटाके उडविण्यास पूर्णपणे बंदी राहणार आहे.

हवेचे प्रदूषण आणि सण यामध्ये संतुलन ठेवण्यासाठी हरित फटाक्यांना परवानगी दिली जात असल्याची टिप्पणी न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान केली. प्रदूषण मंडळाने अधिसूचित केलेले शांतता क्षेत्र, रुग्णालये, नर्सिंग होम, प्राथमिक आणि जिल्हा आरोग्य केंद्रे, वृद्धाश्रम अशा संस्थांच्या तीनशे मीटर परिघात फटाके उडवण्यास बंदी राहील. सर्व संवेदनशील स्थळे व शिक्षण संस्थांचा परिसर फटाके मुक्त म्हणून घोषित करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. या भागांत योग्य बॅरिकेड उभारावेत व अधिसूचित केले जावे, त्यादृष्टीने लोकांमध्ये उचित असा प्रचार आणि प्रसार केला जावा, असे न्या. सुंदरेश यांनी सांगितले.

Supreme Court Diwali Order
Goa High Court: राज्यातील सर्व ग्रामपंचायतींची कर्मचारी संख्या तपासा; उच्च न्यायालयाचे पंचायत संचालनालयाला निर्देश

खंडपीठाचे निर्देश

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अवैध फटाक्यांचे वितरण रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक कारवाई करावी

वाहनांची तपासणी केली जावी

हरित फटाक्यांची विक्री प्रशासनाने निर्धारित केलेली दुकाने व जागेवरच केली जावी

ई कॉमर्स किंवा अन्य ऑनलाइन माध्यमातून फटाक्यांची विक्री केली जाऊ नये

हरित फटाक्यांच्या प्रत्येक पाकिटावर वेगळा ‘क्यूआर कोड’ आवश्यक

हरित फटाके ‘सीएसआयआर’-''निरी’ तसेच ‘पीईएसओ’ संस्थेकडून प्रमाणित असणे गरजेचे

दुकानदारांना अशा फटाक्यांची विक्री पूर्णपणे सीलबंद डब्यांतून करावी लागेल

हरित फटाक्यांची ओळख, विक्रीची तारीख आणि वापराचा वेळ याची माहिती असणारे फलक दुकानदारांनी लावावेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.