Sukhjit Singh's wife Ramandeep Kaur Mann killed her husband for Rs 20 crore LIC Policy:
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील सुखजित सिंग याच्या हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. वृत्तानुसार, सुखजीतची पत्नी रमनदीप कौर मान हिने 20 कोटी रुपयांच्या एलआयसी विम्यासाठी पतीची हत्या केली.
शाहजहांपूर न्यायालयाने एका आठवड्यापूर्वी हत्येप्रकरणी रमनदीप कौर मानला फाशी आणि तिचा प्रियकर गुरप्रीत सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंडमधील डर्बीच्या 38 वर्षीय रमनदीप कौर मान हिचा पती सुखजित सिंग यांनी 2 मिलियन पौंडांची जीवन विमा पॉलिसी काढली होती.
या रकमेसाठी रमनदीप कौरने पतीची हत्या केली. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सुखजीत सिंग यांना बिर्याणी आवडायची. रमणदीपने बिर्याणीतच झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. त्यानंतर सुखजित सिंग झोपला असताना रमणदीपने तिच्या पतीचा गळा चिरून खून केला.
ही घटना 2 सप्टेंबर 2016 रोजी भारतातच घडली होती.
रिपोर्टनुसार, घटनेच्या वेळी रमणदीप तिचा पती सुखजीतसोबत तिच्या आईच्या घरी सुट्ट्यांसाठी भारतात आले होते. रमनजीतसोबत तिचा प्रियकर गरप्रीतही दोषी आढळला.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान रमणदीपच्या मोठ्या मुलाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून जबाब दिला, त्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराला दोषी ठरवण्यात आले.
सुखजीत व्यतिरिक्त त्याचा धाकटा मुलगा आर्यन यालाही झोपेच्या गोळ्या घालून बिर्याणी खायला दिली होती. मात्र, अर्जुनने बिर्याणी खाल्ली नसल्याने त्याला पूर्ण झोप लागली नव्हती.
मोठ्या मुलाने न्यायालयात सांगितले की, घटनेच्या वेळी त्याची आई सुखजीतच्या शेजारी बेडवर झोपली होती. त्याने सांगितले की, झोपेत असताना अचानक त्याला आवाज आला, त्याने डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिले की त्याची आई त्याच्या वडिलांचा गळा चिरत आहे.
यानंतर तेथे उपस्थित गुरप्रीतने माझ्या वडिलांच्या डोक्यावर हातोड्याने वार केले.
सुखजीत आणि पत्नीचा प्रियकर असलेला दोषी गुरप्रीत हे बालपणीचे मित्र होते. 2015 मध्ये सुखजीत त्याच्या कुटुंबासह दुबईला सुट्टीसाठी गेला होता. यादरम्यान गुरप्रीतही तेथे पोहोचला.
गुरप्रीत आणि रमणदीप यांच्यातील अफेअर त्यावेळी सुरू झाले. सुखजीत सिंह 2002 मध्ये शाहजहांपूरच्या बसंतापूर गावातून ब्रिटनला गेला होता, जिथे त्याची बहीण राहते, तर गुरप्रीत दुबईला गेला होता.
2005 मध्ये, सुखजीतने रमनदीप कौर मान हिच्याशी लग्न केले. लग्नानंतर रमणदीप आणि सुखजीत दक्षिण लंडन आणि नंतर डर्बीला राहायला गेले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.